शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

आयटी उद्योगासाठी पोषक वातावरण

By admin | Updated: October 19, 2015 22:33 IST

आयटी उद्योगासाठी पोषक वातावरण

नाशिक : नवीन माहिती तंत्रज्ञान (आयटी) धोरणामध्ये सरकारने नोंदणीकृत उद्योगांना सवलतीच्या दरात वीज, तसेच वाढीव चटई क्षेत्रासह विविध सवलतींचा अंतर्भाव केल्यामुळे या उद्योगासाठी पोषक वातावरण तयार होत आहे़ सरकारच्या या धोरणामुळे येत्या काही वर्षांत या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन उद्योग सहसंचालक बळवंत जोशी यांनी केले़ गंगापूर रोडवरील कर्मवीर बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय व नाशिक डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड एक्सपोटर््स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयटी पॉलिसी- २०१५’ या विषयावरील चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते़ एनडीआयईएचे अध्यक्ष रमेश पवार यांनी सांगितले की, मुंबई पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये आयटी उद्योग फारसा विकसित होऊ शकला नाही. मात्र सरकारच्या नवीन सकारात्मक धोरणामुळे आयटी उद्योगासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आयटी उद्योगाच्या विस्तारासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय व आयटी उद्योजक यांच्या एकत्रित प्रयत्नाची आवश्यकता आहे़ या उद्योगाच्या विकासासाठी सरकारकडेही पाठपुरावा करण्याचे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले़आयटी उद्योगासाठी आवश्यक असलेले कम्युनिकेशनचे जाळे विस्तारण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) प्रयत्नशील असून, शहरात तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार करण्याचे काम सुरू असल्याचे महाव्यवस्थापक सुरेश बाबू प्रजापती यांनी यावेळी दिली. या चर्चासत्रामुळे आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली होती़व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार, बँक आॅफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक प्रताप मोहंती, मविप्रचे शिक्षण अधिकारी रामनाथ चौधरी उपस्थित होते. या चर्चासत्राला विद्यार्थी व आयटी क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)