शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

जिल्ह्यात अत्यल्प बाधितांचेच प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:13 IST

नाशिक : जिल्ह्णात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्णातील सध्या बाधित असलेल्या एकूण २,८८८ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल १,५५९ असिम्पटॅमॅटिक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण्याची शाश्वती अधिक आहे.

ठळक मुद्देबरे होण्याची शाश्वती : ८,६०१ रुग्ण परतले घरी; २८२८ जणांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्णातील सध्या बाधित असलेल्या एकूण २,८८८ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल १,५५९ असिम्पटॅमॅटिक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण्याची शाश्वती अधिक आहे.जिल्ह्णात सद्यस्थितीत २ हजार ८८८ रु ग्णांवर उपचार सुरू असून, रविवार दुपारपर्यंत ४५४ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ९३२ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८७०, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ७९, तर जिल्ह्णाबाहेरील ०७ असे एकूण २ हजार ८८८ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्णात एकूण ११ हजार ९४३ रु ग्ण आढळून आले आहेत. मात्र, त्यातील ८,६०१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन यापूर्वीच घरी परतले आहेत. लक्षणेहीन आठवडाभरात बरेज्या रुग्णांना कोरोनाची अत्यल्प बाधा झालेली आहे किंवा ज्या रुग्णांमध्ये लक्षणे अजिबात नाहीत, केवळ त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ते बाधित ठरले, अशा रुग्णांना बरे होण्याचा कालावधी देखील पाच ते सात दिवस अर्थात केवळ एक आठवडा असतो. त्यामुळे असे अत्यल्प बाधित रुग्ण एखाद्या क्वारंटाइन सेंटरमध्येदेखील अगदी सहजपणे उपचार घेऊन बरे होऊ शकतात. केवळ ९७ रुग्ण व्हेंटिलेटरवर : ज्या रुग्णांना श्वसनाचा प्रचंड त्रास जाणवू लागतो, केवळ अशा रुग्णांनाच आॅक्सिजनवर किंवा सर्वाधिक गंभीर असणाऱ्यांनाच व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. जिल्ह्णात सद्यस्थितीत ६७२ रुग्ण हे आॅक्सिजनवर तर केवळ ९७ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. तालुकानिहाय रुग्णनाशिक १८८चांदवड २४सिन्नर ११७दिंडोरी ५०निफाड १६५देवळा २१नांदगाव ६३येवला ४०त्र्यंबकेश्वर १५सुरगाणा १५पेठ ०३बागलाण ३६इगतपुरी १५४मालेगाव ग्रामीण ४१

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या