शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांचा आकडा आठशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:38 IST

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दोन दिवसांत आणखी झपाट्याने वाढत असून, मंगळवारी (दि. १६) एकाच दिवसात तब्बल ७० रुग्ण आढळल्याने शहरातील बाधितांची संख्या आठशे पार झाली आहेत. आता ही संख्या ८०८ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल १९६ रुग्ण आढळल्याने शहरवासीय हादरले आहेत.

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दोन दिवसांत आणखी झपाट्याने वाढत असून, मंगळवारी (दि. १६) एकाच दिवसात तब्बल ७० रुग्ण आढळल्याने शहरातील बाधितांची संख्या आठशे पार झाली आहेत. आता ही संख्या ८०८ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल १९६ रुग्ण आढळल्याने शहरवासीय हादरले आहेत.सुमारे अडीच ते तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर शासनाने हळूहळू निर्बंध शिथिल करण्याची तयारी केली असून, त्याअंतर्गत लॉकडाऊनमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. तथापि, शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, बाजारपेठा सुरळीत झाल्याचा दुष्परिणाम सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आता नियंत्रणाबाहेर जात असून, तीन दिवसांपासून शहरात बाधितांची संख्या तर साठपेक्षा अधिक आहे. रविवारी (दि.१४) शहरात ५९ बाधित सापडले. त्यानंतर सोमवारी ६५, तर मंगळवारी तब्बल ७० रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच ही संख्या दोनशेच्या घरात गेली आहेत. तर दहाहून अधिक रुग्णांचे तीन दिवसांत मृत्यू झाले आहेत. त्यामुळे शहर हादरले आहे.शहरातील बाधितांची संख्या विविध भागांतील असून, मंगळवारी (दि.१६) विविध भागांतील पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात नाशिकरोड भागातील खोले मळा येथील ४१ वर्षीय इसम, जाधवमळा, जुने नाशिक भागात सात जण तसेच पखालरोड येथील तीन जण, भोई गल्ली येथील दोनजण, रेणुकानगर, वडाळानाका, वडाळारोड, अशोकामार्ग येथील एक जण, शालिमार तर द्वारकावरील पौर्णिमा बस स्टॉपजवळ दोन जणांना त्याचप्रमाणे पाटीलनगर येथील एक नाईकवाडी पुरा, काठेगल्ली, बागवान पुरा, इंदिरानगर येथे एक गोरेराम लेन येथील एक सिडकोत बाजीप्रभू चौकात पाच, साईनाथनगर येथील एक असे रुग्ण आढळले आहेत.---------------------शहराभोवती आवळला फासकेवळ शहरातच नव्हे तर शहराभोवतीच्या परिसरातदेखील रुग्ण आढळत आहेत. भगूर पाठोपाठ देवळाली कॅम्प परिसरात तीन रुग्णं आढळले आहेत. तर नाशिक तालुक्यातील जलालपूर आणि चॉँदसी येथेही रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक