शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी लाभार्थींची वाढणार संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:26 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया आदिवासी योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातप्रमाणपत्राचा अडथळा आता दूर झाला असून, केवळ जातीच्या दाखल्यावर त्यांना जिल्हा परिषदेच्या आदिवासी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे. यामुळे यापुढील काळात आदिवासी विभागातील लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जातप्रमाणपत्राच्या अटीमुळे लाभार्थींचे प्रमाण काहीसे कमी झाले होते.

ठळक मुद्देअडसर दूर : जातपडताळणीची अट शिथिलजिल्हा परिषदेच्या आदिवासी योजनांसाठी अर्ज करता येणार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया आदिवासी योजनांसाठी आवश्यक असलेल्या जातप्रमाणपत्राचा अडथळा आता दूर झाला असून, केवळ जातीच्या दाखल्यावर त्यांना जिल्हा परिषदेच्या आदिवासी योजनांसाठी अर्ज करता येणार आहे. यामुळे यापुढील काळात आदिवासी विभागातील लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जातप्रमाणपत्राच्या अटीमुळे लाभार्थींचे प्रमाण काहीसे कमी झाले होते.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदिवासींसाठी राबविण्यात येणाºया अनेक योजनांसाठी राज्य शासनाने जात प्रमाणपत्र पडताळणीची अट घातली होती. परंतु अनेकांकडे जात पडताळणीचे प्रमाणपत्रच उपलब्ध नसल्याने आदिवासी योजनांसाठीचे अर्ज करण्याचे प्रमाणे कमी झाले होते. या जाचक अटींमुळे आदिवासी बांधव योजनांपासून दुरावत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आदिवासी नेत्यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतलीहोती.आदिवासी भागातील एस.सी, एस.टी. संवर्गातील नागरिकांना जातीचे दाखले देण्यात आले असले तरी जातप्रमाणपत्र पडताळणीचे दाखले केवळ निवडणूक आणि शैक्षणिक कामासाठीच देण्याची तरतूद आहे. त्यामुळे योजनांसाठी पडताळणीचे दाखलेच दिले जात नसल्याने आदिवासी बांधवांपुढे मोठी अडचण निर्माण झाली होती.शासनाच्या महत्त्वकांक्षी विहीर खोदण्याच्या योजनेसाठीही यामुळे अर्ज करण्याची संख्या अवघे दहा टक्के इतकीच होती. सदर बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर आता जात प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली असून, तसा अद्यादेश शासनाने गेल्या शनिवारी काढला. त्यानुसार आता शाळा सोडल्याचा दाखला किंवा कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील प्रमाणपत्र ग्राह्ण धरण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी योजनेच्या मागील अडसर दूर झाल्याने यापुढील काळात योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. लाभार्थी वंचितजिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विहीर बांधण्यासाठी देण्यात येणाºया आर्थिक लाभासाठी अर्ज केलेल्यांची प्रकरणे फेटाळण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता, तर प्रमाणपत्र योजनेच्या कामासाठी मिळत नसल्यानेदेखील मोठी अडचण निर्माण झाली होती. आता जात प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आल्यामुळे योजनेपासून वंचित राहिलोल्यांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज केलेल्यांची प्रकरणेदेखील ग्राह्ण धरली जाणार आहेत.