शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:55 IST

नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूची बाधा खूप कमी प्रमाणात असून, गतवर्षी डेंग्यूचे सहापट रुग्ण अधिक होते. यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात आतापर्यंत २५ संशयित डेंग्यू रुग्ण दाखल झाले असले तरी त्यातील डेंग्यूबाधित रुग्ण केवळ आठ आढळून आले आहेत.

नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूची बाधा खूप कमी प्रमाणात असून, गतवर्षी डेंग्यूचे सहापट रुग्ण अधिक होते. यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात आतापर्यंत २५ संशयित डेंग्यू रुग्ण दाखल झाले असले तरी त्यातील डेंग्यूबाधित रुग्ण केवळ आठ आढळून आले आहेत.महापालिका क्षेत्रात दरवर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या पावसाळ्यात अधिक असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नागरिकांकडूनही घेतली जात असलेल्या दक्षतेच्या पार्श्वभूमीवर यंदा डेंग्यूबाधित रुग्णांच्या संख्येत घट आली आहे. मनपा क्षेत्रात यंदा जुलै महिन्यात आतापर्यंत आठ रुग्ण बाधित आढळले आहेत. गतवर्षी जुलै महिन्याच्या २० तारखेपर्यंत एकूण १४४ संशयित, तर ४८ डेंग्यूबाधित रुग्ण आढळून आले होते. त्या तुलनेत जून महिन्यात गतवर्षी १३ संशयित आणि दोन बाधित होते, तर यंदाच्या वर्षी जून महिन्यात २३ संशयित आणि आठ डेंग्यूबाधित रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. गतवर्षीदेखील जुलै महिन्यापर्यंत डेंग्यूमुळे एकाचाही बळी गेलेला नव्हता. यंदादेखील तिच स्थिती कायम आहे.---------------दरवर्षी डेंग्यूचे प्रमाण पावसाळ्यात वाढते असल्याने डेंग्यूसाठी महापालिकेच्या वतीने विशेष पथके तसेच समितीची स्थापना केली जाते. मात्र, यंदाच्या वर्षी डेंग्यूवाढीचे प्रमाण अत्यल्प असल्याने तसेच आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष कोरोनावर केंद्रित झाले असल्याने कोणत्याही नवीन समितीचे गठन करण्यात आलेले नाही.

टॅग्स :Nashikनाशिक