शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यात कोरोना रुग्णांची संख्या नऊवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:56 IST

सुरगाणा : येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र बंदचा कालावधी वाढवायचा, की ठरावीक वेळ देऊन दुकाने सुरू करावीत याबाबत स्थापन करण्यात आलेली समिती जनतेचा कौल घेऊन शुक्र वारी घेण्यात येणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. शहरात चार प्रतिबंधित क्षेत्र आहे.

सुरगाणा : येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र बंदचा कालावधी वाढवायचा, की ठरावीक वेळ देऊन दुकाने सुरू करावीत याबाबत स्थापन करण्यात आलेली समिती जनतेचा कौल घेऊन शुक्र वारी घेण्यात येणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. शहरात चार प्रतिबंधित क्षेत्र आहे.सुरगाणा येथे पहिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यापासून आतापर्यंत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या नऊ झाली आहे. सद्यस्थितीत येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या ४४ जणांपैकी नऊ जण पॉझिटिव्ह आहेत, तर १३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी सकाळी सोडण्यात आले आहे.२२ जण कॉरण्टाइन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. एक-दोन दिवसात त्यांचा अहवाल प्राप्त होईल. सध्या कॉरण्टाइन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली नऊ पॉझिटिव्ह रु ग्ण तर स्वॅब घेतलेले २२ असे एकूण ३१ जण आहेत. यात महिला व बालकांचा समावेश आहे. पहिला रुग्ण समोर आल्यानंतर येथे सात दिवस शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह रु ग्ण समोर आल्याने २६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थापन करण्यात आलेल्या समितीने घेतला होता. परंतु पुन्हा नवीन रुग्ण वाढून पॉझिटिव्ह रु ग्ण संख्या नऊ झाल्याने सुरगाणा शहर बंदचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ, तेली गल्ली, झेंडा चौक, गांधीनगरचा काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून, हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सतत हात धुवावे, गर्दीत जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.----------------कोरोनाबाधितरु ग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून चौदा दिवस म्हणजे २६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला होता. मात्र पॉझिटिव्ह रु ग्ण नऊ झाले असल्याने २७ जुलैपासून ठरावीक वेळेत दुकाने सुरू करावीत किंवा नाही याबाबत स्थापन करण्यात आलेली समिती शुक्र वारी निर्णय घेईल.- नागेश येवले, मख्याधिकारी, सुरगाणा, नगरपंचायत-----------------जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार नियमांचे पालन नागरिकांनी केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येतो. नागरिकांनी घाबरू नये तर काळजी घ्यावी. कोरोनामुक्त करण्याचे प्रयत्न जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. प्रफुल्ल वसावे, नोडल आॅफिसर, सुरगाणा कोविड सेंटर

टॅग्स :Nashikनाशिक