शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सरासरी वीजबिल भरूनही जादा वीजबिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 18:41 IST

ग्राहकांच्या तक्रारी : महावितरणकडून दुरुस्ती; स्लॅब बेनिफिटही देणार नाशिक : महावितरणकडून प्रतिबंधित भाग वगळता इतर ठिकाणी मीटररीडिंग घेऊन दोन ...

ग्राहकांच्या तक्रारी : महावितरणकडून दुरुस्ती; स्लॅब बेनिफिटही देणारनाशिक : महावितरणकडून प्रतिबंधित भाग वगळता इतर ठिकाणी मीटररीडिंग घेऊन दोन ते अडीच महिन्यांचे एकत्रित वीजबिल देण्यात येत असताना सदर वीजबिल अधिक असल्याच्या तक्र ारी ग्राहकांकडून होत आहे. दरम्यान, मीटररीडिंग व वीजबिल यात तफावत असणारी बिले दुरु स्त करून देण्याबरोबरच लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांनी भरणा केलेल्या रकमेची वीजबिलांमधून कपात करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. एप्रिल व मे महिन्यात मीटररीडिंग घेणे लॉकडाऊनमुळे शक्य झाले नसल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील वीजवापराच्या सरासरी युनिटप्रमाणे या दोन्ही महिन्यांचे वीजबिल आकारण्यात आले आहे. मात्र ग्राहकांनी यासंदर्भात तक्रारी केल्या असून, सरासरीपेक्षा अधिक वीजबिले आले असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना सरासरी वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले होते तसेच अ‍ॅपवर रीडिंग टाकण्याचा पर्यायदेखील महावितरणने दिला होता. मात्र एप्रिल, मे आणि जून महिन्यात स्वत:हून मीटररीडिंग न पाठविणाऱ्या ग्राहकांना आता प्रत्यक्ष वीजवापराची बिले पाठविली जात आहेत. या बिलांबाबतच्या तक्रारी तसेच यापूर्वी सरासरी आणि आगाऊ बिले भरणाऱ्यांच्यादेखील तक्रारी वाढल्याने महावितरणने ग्राहकांचे समाधान करून त्यांच्या बिलांची आवश्यकता असल्यास दुरुस्ती करण्याची भूमिका महावितरणने घेतली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण