शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरबसल्या मिळणार विविध दाखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 16:48 IST

नाशिक : जन्म-मृत्यूच्या दाखल्यांपासून ते विविध प्रकारच्या सेवा-सुविधा येत्या १५ आॅगस्टपासून नाशिककरांना घरबसल्या उपलब्ध होणार असून, त्यासाठी महापालिकेमार्फत आॅनलाइन सेवा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. नागरिकांना त्यामुळे महापालिकेच्या कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. मात्र, कायद्यानुसार विवाह नोंदणीसारख्या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थिती लावावी लागणार ...

नाशिक : जन्म-मृत्यूच्या दाखल्यांपासून ते विविध प्रकारच्या सेवा-सुविधा येत्या १५ आॅगस्टपासून नाशिककरांना घरबसल्या उपलब्ध होणार असून, त्यासाठी महापालिकेमार्फत आॅनलाइन सेवा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. नागरिकांना त्यामुळे महापालिकेच्या कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. मात्र, कायद्यानुसार विवाह नोंदणीसारख्या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थिती लावावी लागणार आहे.महापालिकेमार्फत २२ नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून ४५ प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात. सद्यस्थितीत एस बॅँकेच्या सहकार्याने ही नागरी सुविधा केंद्रे चालविली जात आहेत. मात्र, येत्या १५ आॅगस्टपासून या सेवा आॅनलाइनच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. नागरिकांना आॅनलाइनद्वारे अर्ज करून घरबसल्या विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र प्राप्त करता येणार आहे. सध्या नागरिकांना जन्म-मृत्यूच्या दाखल्यापासून नगररचना, अग्निशमन विभागाशी संबंधित अनेक दाखल्यांसाठी मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये कार्यरत नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून अर्ज करावे लागतात. परंतु, आता सर्व ४५ प्रकारच्या सेवा आॅनलाइनच्या माध्यमातून पुरविल्या जाणार आहेत. नागरिकांनी आॅनलाइनद्वारेच अर्ज दाखल करायचा असून, प्राधिकृत अधिकाºयांच्या स्वाक्षरीने आॅनलाइनच दाखले उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अर्जाचे शुल्क अथवा दाखल्यांच्या प्रतींसाठी लागणारे शुल्कही नेट बॅँकिंगद्वारे आॅनलाइन भरणे शक्य होणार आहे. आॅनलाइन सेवांमुळे महापालिकेचा सद्यस्थितीत स्टेशनरीवर होणारा खर्चही वाचणार आहे. शिवाय, शासनाच्या लोक सेवा हक्क कायद्याचीही काटेकोर अंमलबजावणी होणे शक्य होणार आहे. नागरिकांचा वेळ वाचावा आणि त्यांना कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागू नयेत, या उद्देशाने आॅनलाइन व्यवस्था अधिक प्रभावी व परिणामकारकपणे राबविण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. येत्या १५ आॅगस्टपासून या आॅनलाइन सेवेचा शुभारंभ केला जाणार आहे.