शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये आता पर्यटन विभागाचे प्रादेशिक कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:11 IST

राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा नाशिकला लाभ झाला असून, लवकरच हे कार्यालय सुरू होणार आहे.

नाशिक : राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा नाशिकला लाभ झाला असून, लवकरच हे कार्यालय सुरू होणार आहे.  महाराष्ट्र शासनाने राज्यात पर्यटन संचालनालय व त्याअंतर्गत पाच प्रादेशिक कार्यलये स्थापन करण्याचा निर्णय मार्च २०१६ मध्ये घेतला होता, त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातदेखील पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय असावे म्हणून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आग्रही भूमिका घेतली त्यानुसार नाशिकला पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच मंजुरी देण्यात आली असून, उत्तर महाराष्ट्राला पर्यटन उपसंचालक हे नवीन पददेखील निर्माण करण्याला राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन वाढीला या निर्णयामुळे मोठी चालना मिळणार आहे.  राज्यात पर्यटन संचालनालयाअंतर्गत पाच प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्यासाठी शासन स्तरावरून हालचाली सुरू झाल्यानंतर त्यात नाशिकचे नाव मागे पडले होते, पंरतु पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर महाराष्ट्राला पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाची गरज असून, उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आणून दिली याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातदेखील पर्यटन विभागाचे कार्यालय असावे अशी संकल्पना जयकुमार रावल यांनी मांडली होती.पहिल्या टप्प्यात पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाला मंजुरी मिळाली असून, याबरोबरच पर्यटन उपसंचालक या पदालादेखील मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे लवकरच उत्तर महाराष्ट्राचे नाशिकला पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय सुरू होणार आहे.