शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

आता जुन्या संहितांवरून कलगीतुरा

By admin | Updated: December 11, 2015 00:10 IST

राज्य नाट्य स्पर्धा : रंगकर्मींचा नवा आक्षेप; परीक्षकांचा मात्र तथ्य नसल्याचा दावा

नाशिक : राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालाचे कवित्व अद्याप सुरूच असून, स्पर्धेत सादर केलेल्या जुन्या संहितांवर परीक्षकांची वक्रदृष्टी पडल्याचा नवा आक्षेप रंगकर्मींनी घेतला आहे. परीक्षकांनी मात्र हा तो फेटाळत असे काही घडलेच नसल्याचा दावा केला आहे. ५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे त्याबद्दल नाराजी व्यक्त झाली. अनेक रंगकर्मींनी निकालावर आक्षेप घेत त्यात राजकारण असल्याचा दावाही केला. आता परीक्षकांनी जुन्या संहिता सादर करणाऱ्या रंगकर्मींच्या तोंडावरच नाराजी व्यक्त केल्याचे रंगकर्मींचे म्हणणे आहे. स्पर्धेत चं. प्र. देशपांडे लिखित ‘सामसूम’, गिरीश कर्नाड लिखित ‘हयवदन’, जयवंत दळवी लिखित ‘पुरुष’ ही जुनी नाटके सादर झाली; मात्र त्यांच्या सादरीकरणानंतर मुलाखतीच्या वेळी परीक्षकांनी ‘जुने नाटक का निवडले? नाटक जुने असल्याने ते पाहण्यात उत्सुकता राहत नाही’ अशी टिप्पणी केल्याचा दावा रंगकर्मी करीत आहेत. संहिता जुनी असल्यास पाच गुण कमी होतात; मात्र त्यापलीकडे जाऊन परीक्षकांनी नाराजी व्यक्त करणे चुकीचे असून, अशाने जुनी नाटके सादर होणारच नाही, अशी भीती रंगकर्मी बोलून दाखवत आहेत. परीक्षकांनी मात्र या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. स्पर्धेत जुन्या व नव्या नाटकांचा समतोल हवाच. अन्यथा नव्या पिढीला जुनी नाटके पाहायला मिळणारच नाहीत. जुन्या संहितांविषयी परीक्षकांनी कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नसून, निकालानंतर अशा प्रकारचे दावे करणे हे अपरिपक्वपणाचे लक्षण असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.