शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आता मॅडम नव्हे ताई, माई म्हणणार मुले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:08 IST

लातूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शाळेत ज्ञानदान करणाºया महिला शिक्षकांना मॅडम म्हणण्याऐवजी यापुढे ‘ताई किंवा माई’ या नावाने संबोधावे, असा अध्यादेश काढला असून, संपूर्ण महाराष्टÑात याची अंमलबजावणी होणार आहे.

नामपूर : लातूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शाळेत ज्ञानदान करणाºया महिला शिक्षकांना मॅडम म्हणण्याऐवजी यापुढे ‘ताई किंवा माई’ या नावाने संबोधावे, असा अध्यादेश काढला असून, संपूर्ण महाराष्टÑात याची अंमलबजावणी होणार आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात शिक्षणाची गुणवत्ता जोपासत असतानाच संस्कृती, नीतिमूल्यांची जोपासना करताना मोठ्यांप्रति आदरभाव जोपासण्याचा प्रयत्नही शिक्षण खाते करत असताना दिसत आहे. पूर्वी शाळेतील शिक्षकांना गुरुजी या नावाने संबोधत असत. आताच्या आधुनिक काळात सर किंवा टीचर, स्त्री शिक्षकास मॅडम या नावाने संबोधले जात आहे. ‘मॅडम’ हा शब्द तसा ब्रिटिशकालीनच...! मराठी शाळेतील विद्यार्थी त्यामुळे शिक्षकांना सर, मॅडम या नावाने आदराने हाक मारताना दिसतात. बºयाचशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मॅडम शब्दाचा शॉर्टकट म्हणून ‘मॅम’ म्हणून संबोधले जाते. अध्यापनासारख्या पवित्र व महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अध्यापकाबाबत प्रेम व आदरभाव टिकून रहावा म्हणून ताई व माई हे शब्द वापरल्यास तो दूर होऊन अध्यापनाबाबत जिव्हाळा तयार होईल ही यामागची भूमिका आहे.लातून जिल्हा परिषदेचा जीआर जा. क्र. जिपला/शिक्षण/ कावि/ २२०/२०१७ दिनांक २९/८/१७ अन्वये शिक्षिकांना मॅडमऐवजी ताई-माई संबोधावे असे प्रत्येक पंचायत समितीला कळविण्यात आले आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मूल शाळेत यावं, त्याने शिकावं हा शासनाचा हेतू आहे. शाळांनी यासाठी विशेष कार्ययोजना आखून त्याद्वारे मुले शाळाबाह्य न होता. ते शिक्षणाच्या प्रवाहात कसे टिकून राहतील यासाठी शासन प्रयत्न करीत असते. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार प्रत्येक अध्यापक हा सुलक्षक म्हणून कार्यरत आहे. बºयाच वेळा शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील नातेसंबंधाचा परिणाम मुलांच्या शिकण्यावर होतो. याचाच विचार शासनाने करून प्रस्तावित प्रयोगाद्वारे शिक्षण, आनंददाई, दर्जेदार होण्याचा प्रयत्न होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणात आता शिक्षक होण्यासाठी फक्त आता वशिला व शिक्षणच पुरेसे नसून शिक्षकांच्या अंगी गुणवत्ताही आवश्यक रहाणार आहे. शिक्षक गुणवत्ता चाचणी परीक्षेतही उत्तीर्ण झाला तरच तो शिक्षक होणार आहे.