शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आता कारवाई करून बंड करणार थंड

By admin | Updated: February 11, 2017 00:10 IST

पक्षशिस्त : भाजपाकडे सर्वाधिक बंडखोर

 नाशिक : महापालिका निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी भाजपात झाली असून, बंडखोरांना वेगवेगळ्या पद्धतीने शांत करण्यास जोर आला आहे. आता शुक्रवारपासून बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. अन्य पक्षांच्या वतीनेदेखील आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यातही भाजपा आणि शिवसेनेकडे मिळूनच सुमारे दीड हजार इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्याने अनेक प्रभागांमध्ये बंडाचे निशाण फडकविण्यात आले आहे. त्यात भाजपाकडे बंडखोरी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, माजी नगरसेवक मधुकर हिंगमिरे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाबुराव आढाव इतकेच नव्हे तर सहा महिन्यांपूर्वी नाशिकरोड येथे पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवक मंदा ढिकले यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनीही बंडाचे निशाण हाती घेतले आहे. सातपूर विभागात माजी नगरसेवक रेखा नंदू जाधव यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनीही बंड केले आहे. याशिवाय भाजपाचे अनेक कार्यकर्ते बंडखोर आहेत. अन्य नाराजांनी आणि बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले. तसेच दोन दिवसांपूर्वी भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनीही नाशिकमध्ये येऊन नाराजांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे गुरुवारी अखेरचा पर्याय म्हणून संबंधिताना डेडलाइन देण्यात आली. ती संपल्यानंतर शुक्रवारपासून पक्षातून निलंबन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले.