पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांच्या विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गुरुवार (दि.५) पासून सर्व कामकाज आॅनलाइन सुरू केले जाणार आहे. वाहनाचा कर, शुल्क व वाहनासंबंधी अन्य सर्व कामे आॅनलाइन होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार असल्याने नागरिक आता घरबसल्या वाहनांचा कर भरू शकणार आहेत. वाहनासंबंधी नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेकदा चकरा माराव्या लागतात. काम झाले तर ठीक नाही तर पुन्हा कार्यालयात ये-जा करावी लागत असल्याने नागरिकांचा वेळ वाया जातो व मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र आता नागरिकांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाही. (वार्ताहर)
आता घरबसल्या भरा वाहनांचा कर
By admin | Updated: January 6, 2017 00:19 IST