शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

भविष्य निर्वाह निधीतून आता धार्मिक यात्रेचा खर्च

By admin | Updated: June 3, 2014 02:20 IST

शासनाने दिली कर्मचार्‍यांना सूट

शासनाने दिली कर्मचार्‍यांना सूटनाशिक : यापुढे आता शासकीय कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांना धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्यासाठी भविष्य निर्वाह निधीमधून रक्कम (ना परतावा) काढण्यास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.३१ मे रोजीच यासंदर्भात शासननिर्णय झाला आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८ मधील नियम क्रमांक १६ नुसार वर्गणीदाराची दहा वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर (मध्ये खंड झाला असल्यास खंडित सेवेचा समावेश करून) अथवा नियत सेवानिवृतीपूर्वी दहा वर्षे यापैकी जे आधी घडेल त्यावेळी वर्गणीदाराच्या खाती जमा असलेल्या निधीच्या रकमेतून स्वत:च्या अथवा महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८ च्या नियम २(३) मधील कुटुंबाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट असलेल्या वर्गणीदाराच्या कुटुंबातील व्यक्तींच्या धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्यासाठी रक्कम काढण्यास शासनाने काही अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. त्यात सदर धार्मिक यात्रेचा प्रत्यक्ष खर्च किंवा खात्यावर जमा निधीच्या अर्धी रक्कम किंवा वर्गणीदाराचे सहा महिन्याचे वेतन यापैकी कमी असलेली रक्कम मंजूर करण्यात यावी. या धार्मिक यात्रेच्या खर्चाची रक्कम शासनसेवेतील संपूर्ण कालावधीत फक्त एकदाच अनुदेय असेल. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमामध्ये याप्रमाणे सुधारणा करण्याबाबतची अधिसूचना यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असे शासननिर्णयात म्हटले आहे. या निर्णयाचा हज यात्रेसाठी जाणार्‍या मुस्लीम कर्मचारी बांधवांना मुख्यत्वे फायदा होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)