शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आता ध्वज उतरवण्यावरूनही वाद

By admin | Updated: September 19, 2015 22:52 IST

पेच : ‘दिगंबर’ने उतरवला; अन्य दोन आखाड्यांची वेगळी भूमिका

नाशिक : संपूर्ण कुंभमेळा वादविवादांनी गाजल्यानंतर आता तो संपल्यावरही वादविवाद पाठ सोडायला तयार नाही. कुंभमेळ्यासाठी तिन्ही अनी आखाड्यांनी उभारलेले ध्वज उतरवण्यावरून आता नवा वाद उभा राहिला आहे. दिगंबर आखाड्याने शनिवारी सकाळीच आपला ध्वज उतरवला, तर उर्वरित दोन्ही आखाड्यांनी मात्र आपापले ध्वज कायमस्वरूपी ठेवण्याची भूमिका घेतल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. कुंभमेळ्याचे शाहीस्नान जवळ आल्याची द्वाही साधू व भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साधूंच्या आखाड्यांमार्फत ध्वजारोहण केले जाते. त्यानुसार गेल्या १९ आॅगस्ट रोजी साधुग्राममध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला.दिगंबर, निर्वाणी व निर्मोही आखाड्यांत विधिवत पूजनानंतर प्रमुख महंतांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आले. दिगंबर आखाड्याचा ध्वज पंचरंगी, निर्वाणी आखाड्याचा ध्वज लाल, तर निर्मोही आखाड्याचा ध्वज पांढऱ्या रंगाचा असून, सर्व ध्वजांवर उडत्या हनुमानाची सारखीच छबी साकारण्यात आली आहे. सदर ध्वज कुंभमेळ्याची तिन्ही शाहीस्नाने झाल्यानंतर म्हणजे साधारणत: महिनाभराने उतरवले जातील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानुसार दिगंबर आखाड्याने शुक्रवारी पर्वणी झाल्यानंतर आज सकाळी ६ वाजता आपल्या पंचरंगी ध्वजाची विधिवत पूजा करून पंचांच्या उपस्थितीत ध्वज उतरवला. दुसरीकडे निर्वाणी व निर्मोही आखाड्याने मात्र सध्या ध्वज उतरवला जाणार नसल्याचे सांगितले. नाशिक महापालिकेने सदर जागा कायमस्वरूपी आखाड्यांसाठी आरक्षित केली असल्याने ध्वज व चरणपादुका स्थायी स्वरूपात ठेवणार असल्याचे या आखाड्यातील काही महंतांनी सांगितले. तर काहींनी मात्र वर्षभरानंतर ध्वज काढणार असल्याची माहिती दिली. दिगंबर आखाड्याला प्रथा-परंपरा माहीत नसून, त्यांनी विना पूजाअर्चा ध्वज उतरवल्याची टीकाही काहींनी केली. दुसरीकडे आम्ही आमच्या परंपरेनुसार ध्वज उतरवला, कोण काय म्हणते याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, असे दिगंबर आखाड्यातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)