शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आता नाशिकमधून वर्षभरासाठी कार्गो सेवा शक्य

By admin | Updated: September 2, 2016 23:00 IST

शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक : बदल्यात विदेशी फळांची आयात करणार

 नाशिक : हॉल्कॉनच्या कार्गोसेवेचा वापर करीत नाशिकमधून शेळ्या-मेंढ्यांची शारजाला निर्यात झाल्यानंतर आता या सेवेचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र शेळ्या-मेंढ्यांची वर्षभर निर्यात करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात असून, त्या माध्यमातून विदेशी फळांची आयात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नाशिकमध्ये ओझर येथील एचएएल आणि कॉनकॉर यांची संयुक्त कंपनी असलेल्या हॉल्कॉनमध्ये हवाईमार्गाने माल वाहतुकीची सेवा उपलब्ध आहे. मात्र २०११ मध्ये या सेवेसाठी सर्व तयारी करूनही आजवर येथून थेट हवाईमार्गे माल पाठविला जात नव्हता. नाशिकच्या काही उद्योजकांचा माल येथून कंटेनरने मुंबईला आणि तेथून विमानाने अन्य देशांत पाठविला जात असे. मात्र, नाशिकमधील सानप अ‍ॅग्रोनिमलने प्रथमच धाडस करीत थेट विमान भाड्याने नाशिकला आणून हॉलकॉनच्या कार्गाेसेवेचा वापर सुरू केला आणि पडित असलेल्या हॉलकॉनच्या बेसला उजाळा मिळाला. या घटनेनंतर हॉलकॉनकडे शेकडो उद्योजकांकडून मालवाहतुकीची विचारणा होत आहे. मात्र प्रत्यक्षात अशी वाहतूक सहज सोपी नसल्याचे हॉलकॉनचे म्हणणे आहे, तर गेल्या २७ तारखेला पंधरा हजार शेळ्या-मेंढ्यांची निर्यात करणाऱ्या सानप अ‍ॅग्रोनिमल्सने आता कार्गोविमान सेवेच्या कंपनीशी वर्षभरासाठी कंत्राट करण्याची तयारी सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत दर आठवड्याला कार्गो विमान शारजाला जाणे शक्य असून, त्यातून आखाती देशात शेळ्या-मेंढ्या पुरवण्याची योजना आहे. आखाती देशात असलेली मागणी आणि विमानातून अवघ्या तीन तासांत माल पोहोचवण्याची झालेली व्यवस्था यामुळे गुजरातच्या कांडला बंदरावरून होणारी जीवंत जनावरांची वाहतूक नाशिकमार्गे स्थलांतरित होण्याची शक्यता असून, नाशिक हे प्रमुख केंद्र बनणे शक्य असल्याचे कंपनीचे संचालक हेमंत सानप यांनी सांगितले.शारजावरून नाशिककडे येणारे विमान रिकामे असते. केवळ शेळ्या-मेंढ्यांच्या वाहतुकीसाठी रिकामे पिंजरे आणले जातात. मात्र आता या रिकाम्या विमानातून इजिप्त किंवा अन्य देशांतील फळे नाशिकमार्गे भारतात पुरविणे शक्य असल्याचेही सानप यांनी सांगितले. कार्गोसेवेसाठी विमान कंपनीशी वर्षभराचा करार केल्यास कंपनी दर कमी करण्यास तयार असून, त्यामुळेच नाशिकमधून वर्षभर कार्गोसेवा देण्याची तयारी असल्याचे सानप यांनी सांगितले.