शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

आता अ‍ॅँड्रॉइड रेडिओ जयभीम

By admin | Updated: April 14, 2016 00:50 IST

नाशिकच्या युवकाची निर्मिती : आज होणार आंतरराष्ट्रीय उद्घाटन

 नाशिक : राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचविसाव्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या विचारांचे प्रचार प्रसार करणारे विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र, त्यांच्या विचारांना वाहिलेला खास अ‍ॅँड्रॉइड रेडिओ जयभीम नाशिकच्या एका युवकाने तयार केले असून गुरुवारी (दि. १४) आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने या रेडिओचे उद्घाटन अमेरिका येथे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच मुंबई येथेही मानखुर्द येथून प्रसारणाचा प्रारंभ होणार आहे.नाशिकच्या राहुल श्रीवंश या युवकाने हा रेडिओ तयार केला आहे. सध्या अ‍ॅँड्रॉइड फोन सर्वांच्याच हातात असतो, अशा वेळी त्याचा चांगल्या कामांसाठी वापर व्हावा या विचाराने त्यांनी हे अ‍ॅँड्रॉइड रेडिओचे अ‍ॅप तयार केले असून ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. देशाला राज्य घटना देणारे आणि केवळ दलितांनाच नव्हे तर सर्वच समाजाला प्रेरणादायी असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य कोणीही विसरू शकत नाही. सध्या त्यांचा १२५ वा जयंती उत्सव असल्याने यानिमित्ताने साऱ्यांनाच त्यांचे कार्य कळावे आणि अगदी ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांनादेखील यानिमित्ताने केवळ आंबेडकरांची माहिती तसेच बौद्ध धर्मासंबंधी भन्तेजींची प्रवचने उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर अन्य जीवनावश्यक माहिती, जसे करिअर जॉब्ज, शासकीय योजना, स्वयंरोजगार, व्यवसाय समुपदेशन, लघु उद्योग यासंदर्भातील माहिती उपलब्ध आहे. तसेच याच रेडिओवर राष्ट्रीय ते स्थानिक घडामोडी शेअर करता येतील तसेच हा कम्युनिटी रेडिओ असल्याने त्यावर सामाजिक घडामोडी आणि कायदेशीर ज्ञान, व्यसनमुक्तीसारख्या विषयांवर प्रबोधन देखील करण्यात येत आहे. भीमगीते आणि संगीताचे अन्य कार्यक्रमही जयभीमवर उपलब्ध आहेत. या रेिडओचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही अ‍ॅँड्रॉइड फोनवर प्लेस्टोअरमधून तो डाउनलोड करता येईल. सध्या फोरजीचा जमाना असला तरी टू जी स्पीडवर तो हेडफोनशिवाय मोठ्या आवाजात ऐकता येईल. तसेच बफिरिंग होणार नसल्याने विना व्यत्यय प्रसारण ऐकता येईल. जगाच्या कानाकोपऱ्यातून ऐकता येईल. श्रीवंश यांनी यापूर्वी रेडिओ नमकीन हा कम्युनिटी रेडिओ, तर शिवा हा खास शेतकऱ्यांसाठी अ‍ॅँड्रॉइड रेडिओ सुरू केला आहे.