शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मतदार जागृतीसाठी आता घंटागाडीवर गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:14 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याबरोबरच, नवीन मतदार नोंदणीवर भर देण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांनी दिल्या.

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याबरोबरच, नवीन मतदार नोंदणीवर भर देण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांनी दिल्या. मतदार जागृतीसाठी आता शहरात कचरा गोळा करणाऱ्या महापालिकेच्या घंटागाडीवरून गजर करण्याची नवीन कल्पना आयोगाला सुचविण्यात आली.  निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत केल्या जात असलेल्या कार्यवाहीचा बुधवारी अश्विनकुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी व ज्या विधानसभा मतदारसंघात काम कमी झाले आहे, अशा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात नाशिकचाही समावेश होता. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जागृती मोहीम राबविण्याबरोबरच त्यासाठी विविध संकल्पना राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या. शिवाय नवमतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्यात यावी,  सर्व मतदारांची छायाचित्रे गोळा करावीत, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांची नावे वगळण्यात यावी, प्रत्येक घरोघरी जाऊन बीएलओंनी भेटी देऊन माहिती अद्ययावत करावी आदी सूचना त्यांनी दिल्या. सरकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाºया रहिवाशांची मतदार नोंदणी करण्याची जबाबदारी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांवर सोपविण्याच्या निर्णयाची आठवणही त्यांनी करून दिली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार निबंधकांची मदत घेण्याचे सांगण्यात आले. मतदार जागृतीबाबत काय संकल्पना राबविल्या गेल्या याचा आढावाही अश्विनकुमार यांनी घेतला. नाशिक शहरातील मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दररोज प्रत्येक गल्ली, चौकातून कचरा गोळा करणाºया महापालिकेच्या घंटागाडीद्वारे गजर करण्याची कल्पना नाशिक तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी मांडल्याने त्यास मान्यता देण्यात आली.मशिदींमध्ये करणार प्रचारनाशिक शहरातील मशिदींमध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी मुस्लीम धर्मीयाकडून विशेष नमाजपठण केले जाते. या नमाजपठणासाठी सर्वच उपस्थित असतात, त्यामुळे नेमके त्याच वेळी मशिदींमध्ये जाऊन धर्मगुरू, मौलानांकरवी मुस्लीम मतदारांची नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल खात्यातील काही मुस्लीम कर्मचारी, अधिकाºयांची मदत घेण्याचेही ठरविण्यात आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय