शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘एअर अ‍ॅम्बुलन्स’ही नाशिककरांसाठी धावणार विमानतळाचा फायदा : अवयवदानासाठी उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:06 IST

विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने आता एअर अ‍ॅम्बुलन्सच्या विषयालादेखील चालना मिळाली असून, एका खासगी कंपनीने तसा प्रस्ताव इंडियन मेडिकल असोसिएशनकडे गुरुवारी (दि. २८) सादर केला.

ठळक मुद्देएअर अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरू करण्याबाबत चर्चा एअर अम्बुलन्स गरजेनुसार उपलब्ध

नाशिक : विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने आता एअर अ‍ॅम्बुलन्सच्या विषयालादेखील चालना मिळाली असून, एका खासगी कंपनीने तसा प्रस्ताव इंडियन मेडिकल असोसिएशनकडे गुरुवारी (दि. २८) सादर केला. कंपनीच्या प्रस्तावाबाबत आयएमएच्या कार्यकारिणीत चर्चा होणार असली तरी अशाप्रकारच्या सेवांचा पर्याय उपलब्ध झाल्यास दुर्धर आजाराच्या रुग्णांबरोबरच अवयवदानासाठी मदत होणार होईल आणि ग्रीन कॉरिडोरला पर्याय उपलब्ध होणार आहे.नाशिकमध्ये एअर अ‍ॅम्बुलन्सची सेवा सुरू करण्याबाबत वेळोवेळी चर्चा झाली आहे. कुंभमेळ्याच्या दरम्यान महामार्गावर किंवा अन्य कोठेही दुर्घटना घडली तर त्यावेळीदेखील संबंधितांना तातडीने उपचार मिळावे यासाठी एअर अ‍ॅम्बुलन्सची शक्यता पडताळली गेली होती, मात्र आता पर एअर या कंपनीने नाशिकला एअर अम्बुलन्स गरजेनुसार उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. नाशिकचे ओझर विमानतळ पूर्वीपासून उपलब्ध होतेच, नुकतीच एअर डेक्कनने विमानसेवा सुरू केली असून त्यामुळे एअर अ‍ॅम्बुलन्सलाही या विमानतळाचा वापर करता येणार आहे, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी आयएमएला सांगितल्याचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी सांगितले.कंपनीने दोन प्रकारच्या अ‍ॅम्बुलन्सचे प्रस्ताव दिले असून त्यानुसार ७० हजार व १ लाख १० हजार रुपये असे दर दिले आहेत. मुंबईहून अन्य महानगरांसाठी जोडणारी एअर अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध करून देण्याचाही कंपनीचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात नाशिकमधील वैद्यकीय व्यावसायिकांना याबाबत अवगत करून देण्यात येणार आहे. यावेळी गिरीश मोहिते उपस्थित होते. अर्थात हा फक्त प्रस्ताव असून, नाशिकमध्ये अन्य अनेक कंपन्यादेखील अशी सेवा देण्याच्या तयारीत आहे.