शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता बारा वर्षांनीच बहिष्काराची भाषा

By admin | Updated: September 19, 2015 22:41 IST

पर्वणी संपली : प्रशासनाने सोडला सुटकेचा नि:श्वास

नाशिक : वर्षभरापूर्वी सिंहस्थ कामाने वेग घेतला आणि ज्यांच्यासाठी सोयी-सुविधा करण्याचे घाटत गेले, त्यांनी किरकोळ कारणावरून थेट सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाहीस्नानावरच बहिष्काराची भाषा केली. कधी साधू-महंतांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप, तर कधी कामे निकृष्ट होत असल्याने कुंभमेळ्यासाठी नाशिकला न येण्याचे अस्त्र उगारले गेले. पारंपरिकता व धार्मिकतेशी निगडीत असलेल्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून साधू-महंत व लाखोंनी भाविक येणार असल्याने नसत्या बदनामीच्या भीतीने प्रशासन वारंवार झुकले, तर शासनानेही साधूंपुढे गुढगे टेकले. अगदी पर्वणीच्या पूर्वसंध्येपर्यंत मेळा अधिकाऱ्यांकरवी नाकदुऱ्या काढण्याचे काम केले गेले, पर्वणी पार पडली आता कुंभमेळा गुंडाळण्याचा जसा सोपस्कार बाकी आहे, तसाच ‘शाहीस्नान नही होंगा’ या निर्वाणीच्या बहिष्काराची भाषादेखील थेट बारा वर्षांनीच कानी पडणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तीनही पर्वण्या भर पावसाळ्यात येत असल्यामुळे त्याच्या नियोजनात व अन्य ठिकाणच्या कुंभमेळ्याच्या नियोजनात मोठा फरक आहे, त्यातच ज्या तपोभूमीत कुंभ भरतो त्याठिकाणी जागेची अडचण असल्याने अशी जागा ताब्यात घेण्यासाठी जागामालकांची मिनतवारी करणे दर कुंभाला ठरलेले, त्यातही प्रशासनाला जागेची असलेली निकड पाहून जागामालकांकडून होणाऱ्या जास्तीच्या मोबदल्याची मागणी व तो न मिळाल्यास थेट न्यायालयात प्रकरण ढकलून कालापव्यय ठरलेला. अशा परिस्थितीतही जागा ताब्यात घेतल्यानंतर त्यावर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र असे कामे करताना निव्वळ विश्वासात घेतले नसल्याचे कारण पुढे करून वर्षभरापासून साधू-महंतांनी वेळोवेळी बहिष्काराची भाषा वापरून प्रशासनातील अधिकाऱ्यांची दमछाक केली. ज्या ज्यावेळी बहिष्काराची धमकी देण्यात आली, दुसऱ्याच दिवशी सारेच हादरू लागले, बैठकांवर बैठका व व्यवस्थित काम करण्याच्या आश्वासनांचा भडिमार होऊ लागला. कोपलेले साधू-महंत दुसऱ्याच क्षणी गप्पगार होऊ लागले. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम वेळेत पार पाडण्याचे आव्हान व दुसरीकडे साधू-महंतांची सरबराई करण्याचा हा खेळ साधारणत: वर्षभर कायम राहिला. मग कधी जागावाटपावरून रूसवा फुगवा राहिला, तर आखाडे, खालशांना पुरेशा सुविधा दिल्या नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यात मानापमानामुळे बहिष्कारही टाकण्यात आला, तर आखाड्यांच्या अंतर्गत वादातूनही प्रशासनालाच वेठीस धरण्यात आले. एवढे सारे करूनही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मौन पाळून समजूतदारपणाचीच भूमिका घेतली. शुक्रवारी नाशिकच्या कुंभमेळ्याची अखेरची पर्वणी पार पडत असतानाही झालेल्या गोंधळातून शासन-प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना साधू-महंतांची मिनतवारी करावी लागली. एकदाचे स्नान आटोपले, साधू-महंत आखाड्यात परतले. आता तसे पाहिले तर त्यांच्या परतीचे वेध सुरू झाले. कुंभमेळा समाप्तीची जशी फक्त औपचारिकता बाकी राहिली तशीच त्याबरोबर थेट बारा वर्षांपर्यंत बहिष्काराची भाषाही हवेत विरली.