शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता अंत्यसंस्कारासाठीही आधार कार्ड सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:19 IST

नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. यासंदर्भात जनक्षोभ लक्षात घेता सरकारने आधार कार्ड नसेल तर अर्जदाराला तसे प्रमाणपत्र देण्यास सांगावे आणि प्रमाणपत्रातील माहिती चुकीची निघाल्यास कारवाई होऊ शकते असे अवगत करण्याची सूचना देणारे पत्र मंगळवारी जारी केले आहे. त्यामुळे आधारकार्ड सादर न करणेदेखील तितकेच संकटात टाकणारे ठरले आहे.

नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. यासंदर्भात जनक्षोभ लक्षात घेता सरकारने आधार कार्ड नसेल तर अर्जदाराला तसे प्रमाणपत्र देण्यास सांगावे आणि प्रमाणपत्रातील माहिती चुकीची निघाल्यास कारवाई होऊ शकते असे अवगत करण्याची सूचना देणारे पत्र मंगळवारी जारी केले आहे. त्यामुळे आधारकार्ड सादर न करणेदेखील तितकेच संकटात टाकणारे ठरले आहे.

केंद्र सरकारने आधारकार्ड योजना आणून अनेक वर्षे झाली तरी अद्यापही बहुतांशी नागरिकांकडे आधारकार्ड नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना बायोमेट्रिक म्हणजेच बोटांच्या ठशांची जुळणी होत नसल्याच्या किंवा अन्य तक्रारी आहेत. दुसरीकडे शासनाने सर्वच शासकीय योजनांसाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहेच, शिवाय अमरधाममध्ये सक्तीचे केले आहेत. मृत व्यक्तीच्या नावाचे आधारकार्ड आवश्यक करण्यात आले असून, ते कार्ड नसेल तर मृत्यूचा दाखला मिळणार नाही असे सांगण्यात येते. त्यामुळे अनेक अडचणी उद््भवत आहेत. नाशिक महापालिकेच्या अमरधाममध्येही देखील आधारकार्ड सक्तीचे असून, ती माहिती न मिळाल्यास अनेक अडचणी येत आहेत. एखाद्या व्यक्तीकडे आधारकार्ड नसू शकते. त्याचप्रमाणे बाहेरगावाहूनआलेल्या व्यक्तीचे आपल्या नाशिक स्थित आप्तेष्टांकडे निधन झाल्यास त्याचे आधारकार्ड कोठून आणायचे? असा प्रश्न आहे. बेवारस मृतदेहांबाबत काय करायचे हादेखील प्रश्न आहे.यासंदर्भात, कॉँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी या आडमुठेपणामुळे मृत व्यक्तीला मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागत आहेत. आधाराकार्ड नसेल तर मृत्यूचा दाखला नंतर मिळणार नाही, असे सांगितले जात असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. आधारकार्ड नसल्याने कोठेही अंत्यसंस्कार करण्यास अडथळे आले नसलेतरी अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात असलेल्याकुटुंबीयांनी आधारकार्ड शोधत आणायचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालकांनी मंगळवारी (दि.३) काढलेल्या आदेशात मृत व्यक्तीचे आधारकार्ड नसेल तर अर्जदाराकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे आणि हे प्रमाणपत्र खोटे असल्याचे आढळले, तर जन्म-मृत्यू अधिनियमानुसार गुन्हा ठरू शकतो, असे संबंधितांना सूचित करावे, असे त्यात नमूद केले आहे.आधार कार्डची सक्ती डोकेदुखी ठरवणारीनाशिक महापालिकेच्या वतीने अमरधामध्ये मृत व्यक्तीची माहिती भरून घेण्याच्या अर्जात मृत व्यक्ती दारू किंवा तत्सम उत्तेजक पदार्थांचे सेवन करीत होते काय, पानसुपारी, सिगारेट, बिडीचे व्यसन होते काय, असल्यास किती वर्षे, अशाप्रकारची माहिती भरून घेतली जाते. सरकारने २०१२ पासूनच ही माहिती आवश्यक केल्याचे सांगितले जात असले तरी अशाप्रकारे प्रश्न मृत्यूनंतर विचारून काय साध्य होणार, असा प्रश्न केला जात आहे. त्यात आता आधारकार्डाची सक्तीही डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे.