शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे पैसे थांबविण्याच्या सूचना

By admin | Updated: May 11, 2017 00:21 IST

नांदगाव : दिलेल्या धनादेशांचे पेमेंट थांबविण्याच्या सूचना बँकेला देऊन अडवणूक केली जात असल्याचा प्रकार व्यापारी करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : आपणच दिलेल्या धनादेशांचे पेमेंट थांबविण्याच्या सूचना बँकेला देऊन अडवणूक केली जात असल्याचा प्रकार येथील बाजार समितीचे मान्यताप्राप्त खरेदीदार व्यापारी करत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आर्थिक जिकिरीस आलेले शेतकरी, परत आलेले चेक घेऊन व्यापारी व बाजार समितीचे उंबरठे झिजवत आहेत.पिंप्राळे येथील शेतकरी निवृत्ती व्हडगळ यांचा लाल कांदा एका कंपनीने दि. ३ मार्च रोजी खरेदी केला. कांद्याच्या रकमेपोटी १२८८७ रूपये इतक्या रकमेचा दि. ६ मार्चचा येवला शाखेतील एका बॅँकेचा धनादेश दिला. व्हडगळ यांनी त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यात तो जमा केला. सुमारे दोन महिन्यांनी २ मे रोजी बँकेने सदर धनादेशाच्या बदल्यात रक्कम देण्याचे तो देणाऱ्यानेच थांबविण्यात आले आहे, असे कळवून तो परत दिला. व्हडगळ यांच्यासारखे अनेक शेतकरी आहेत त्यांचे लाखो रु पये या कंपनीकडे असल्याच्या तक्र ारी बाजार समितीकडे करण्यात आलेल्या आहेत.शहरात राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका आहेत. असे असताना बाहेर गावच्या (नांदगावमध्ये शाखा नसलेल्या) बँकेच्या शाखेचे चेक देण्यात आले. एकीकडे धनादेश दिले पण त्याचवेळी पेमेंट अदा करू नये अशा सूचना बँकेस देण्यात आल्याचे दिसून येते. यापूर्वी खात्यावर रक्कम नसल्याने धनादेश वटत नसल्याचे प्रकार झाले. या पार्श्वभूमीवर देय रकमा लांबविण्याचा वरील नवा फंडा उदयास आला आहे. ओंकारजी ट्रेडिंग कंपनीचे मायानंद पाटील व बाणेश्वर कृषी सेवा केंद्राचे दयानंद पाटील या अ वर्ग खरेदीदारांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांनी तत्काळ पेमेंट अदा करावे अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा नोटिसा बजावल्या आहेत. तसेच परवाना कायमचा रद्द का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली आहे.नोटाबंदीमुळे शेतकरी वर्गाची अडवणूक होऊ नये म्हणून बाजार समितीने आरटीजीएस/एनईएफटीने खरेदीदारांनी पेमेंट करावे ,असा प्रयत्न सभापती तेज कवडे व संचालक मंडळाने यांनी केला होता. परंतु राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांनी या प्रस्तावास नकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता जिल्हा निबंधकांनी वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप करावा, असा समितीचा प्रयत्न सुरु आहे.