शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर न भरल्याने जिल्हा परिषदेला नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:39 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ठेकेदारांच्या बिलामधून कपात केलेला पाच टक्के व्हॅट व दोन टक्के टीडीएस विक्र ीकर व प्राप्तिकर विभागांपर्यंत पोहोचला नसल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषदेने दिलेले जिल्हा बॅँकेचे धनादेश न वटता परत आल्याने या दोन्ही विभागांनी जिल्हा परिषदेकडे तगादा लावला असल्याचे समजते. सुमारे १४ कोटींचा भरणा करण्यास पाच महिने विलंब झाल्याने त्यावर आकारल्या जाणाºया व्याजाची भरपाई कोणी करायची, असा नवीनच प्रश्न यातून निर्माण झाला आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ठेकेदारांच्या बिलामधून कपात केलेला पाच टक्के व्हॅट व दोन टक्के टीडीएस विक्र ीकर व प्राप्तिकर विभागांपर्यंत पोहोचला नसल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषदेने दिलेले जिल्हा बॅँकेचे धनादेश न वटता परत आल्याने या दोन्ही विभागांनी जिल्हा परिषदेकडे तगादा लावला असल्याचे समजते. सुमारे १४ कोटींचा भरणा करण्यास पाच महिने विलंब झाल्याने त्यावर आकारल्या जाणाºया व्याजाची भरपाई कोणी करायची, असा नवीनच प्रश्न यातून निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेचे बांधकाम व लघुपाटबंधारे विभाग ठेकेदारांना बिल देताना त्यातून पाच टक्के व्हॅट व दोन टक्के टीडीएस कपात करते. या दोन्ही करांची कपात केल्यानंतर ते कर त्या त्या विभागाकडे जमा केले जातात. त्यानंतर ठेकेदारांना कर कपातीची प्रमाणपत्रेही दिली जातात. याशिवाय ठेकेदारांना त्यांच्या बिलातून कपात केलेली रक्कम आॅनलाइन बघताही येते. या वर्षी मार्च अखेरीस जिल्हा परिषदेने विविध विभागांची कामे केलेल्या ठेकेदारांच्या जवळपास २०० कोटींच्या बिलामधून व्हॅट व टीडीएसची सुमारे १४ कोटी रु पये कपात केली आहे. या ठेकेदारांनी त्यांचा आयकर परतावा भरताना ही कपातही प्राप्तिकर विवरणामध्ये दाखिवली आहे. जिल्हा परिषदेनेही या करांचा भरणा करण्यासाठी विक्र ीकर विभाग व प्राप्तिकर विभाग यांना जिल्हा बॅँकेचे धनादेश दिले आहेत. परंतु आॅगस्ट महिना सुरू झाला, तरी जिल्हा बॅँकेचे धनादेश वटले नाहीत. यामुळे या दोन्ही विभागांनी जिल्हा परिषदेकडे धनादेश बदलून देण्यासाठी तगादा लावला आहे. जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने हे धनादेश परत मागवून या दोन्ही विभागांच्या खात्यात आरटीजीएसने रक्कम जमा करण्याच्या पर्यायाची चाचपणी केल्याची चर्चा आहे. हे दोन्ही कर वेळेत जमा न झाल्यामुळे त्यावरील व्याजाची रक्कम जिल्हा परिषदेकडून वसूल केली जाणार असल्याचेही समजते.तसे झाल्यास या व्याजाचा भरणा कसा करणार, असा नवीन कायदेशीर पेच जिल्हा परिषदेच्या लेखा विभागासमोर निर्माण झाला आहे.

विक्र ीकर विभागाने जिल्हा बॅँकेचे न वटलेले धनादेश परत केले आहेत. तशीच परिस्थिती टीडीएसबाबतही असू शकते. याबाबत अधिक माहिती घेतली जाईल.- अनिल लांडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक.