शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

मुद्रणालयात नोटा छपाई कामाचे आॅडिट

By admin | Updated: March 27, 2017 01:09 IST

नाशिकरोड : नोटाबंदीच्या काळात नाशिकरोडच्या करन्सी नोटप्रेसमध्ये झालेल्या नव्या चलनातील नोटा छपाई कामाचे आॅडिट मुद्रणालय महामंडळाकडून करण्यात आल्याचे वृत्त आहे.

नाशिकरोड : नोटाबंदीच्या काळात नाशिकरोडच्या करन्सी नोटप्रेसमध्ये झालेल्या नव्या चलनातील नोटा छपाई कामाचे आॅडिट मुद्रणालय महामंडळाकडून करण्यात आल्याचे वृत्त आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी नोटा छपाई आणि त्यावरील खर्च त्याबरोबरच सद्यस्थितीतील यंत्रे याबाबतची माहिती जाणून घेतल्याचे समजते. मुद्रणालय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण गर्ग, तंत्रज्ञ संचालय अजय श्रीवास्तव यांनी रविवारी चलार्थ पत्र व भारत प्रतिभूती या दोन्ही मुद्रणालयांस भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली.केंद्र शासनाच्या नोटाबंदी निर्णयाच्या पूर्वी चलार्थ पत्र मुद्रणालयात तेव्हाच्या काळात ५०० व एक हजाराच्या नोटा छापून तयार होत्या. रविवारी गर्ग व श्रीवास्तव यांनी चलार्थपत्र मुद्रणालयास  भेट देऊन ५०० व हजार रुपयांच्या छापून तयार असलेल्या नोटा व नोटा छापण्यासाठी झालेला खर्च याची माहिती घेतल्याचे वृत्त आहे. तसेच मुद्रणालयातील यंत्रांची स्थिती आणि नवीन यंत्रांची गरज यांची माहिती घेतली. त्यानंतर दुपारी गर्ग व श्रीवास्तव यांनी भारत प्रतिभूती मुद्रणालयास भेट देऊन विभागवार पाहणी केली. तेथेही यंत्रांची परिस्थिती व कामकाजाची माहिती घेतली. यावेळी दोन्ही मुद्रणालयांचे महाप्रबंधक सुधीर साहू, एस. के. वर्मा इतर वरिष्ठ अधिकारी, मुद्रणालयाच्या मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.