शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी सक्तीच्या भूसंपादनाकरिता नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 23:04 IST

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देण्यास नकार देणाºया नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील सुमारे दीड हजार शेतकºयांची सहाशे हेक्टर जागा सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असून, त्यासाठी शेतकºयांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू झाली आहे. नोटीस बजावल्यानंतरही जमीन देण्यास संमती दर्शविणाºया शेतकºयांना पाच पट मोबदला दिला जाईल, मात्र ज्यांनी नोटिसीला प्रतिसाद दिला नाही, अशांच्या जमिनी संपादित करून मोबदल्याची रक्कम थेट न्यायालयात जमा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे८७ टक्के जागा ताब्यात : शेतकऱ्यांना पाचपट मोबदला

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देण्यास नकार देणाºया नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील सुमारे दीड हजार शेतकºयांची सहाशे हेक्टर जागा सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असून, त्यासाठी शेतकºयांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू झाली आहे. नोटीस बजावल्यानंतरही जमीन देण्यास संमती दर्शविणाºया शेतकºयांना पाच पट मोबदला दिला जाईल, मात्र ज्यांनी नोटिसीला प्रतिसाद दिला नाही, अशांच्या जमिनी संपादित करून मोबदल्याची रक्कम थेट न्यायालयात जमा करण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्णातील ४९ गावांमधून जाणाºया समृद्धी महामार्गासाठी सुमारे १२०० हेक्टर जागेची निकड असून, त्यापैकी ८७ टक्केजमीन शेतकºयांच्या संमतीने थेट खरेदीने रस्ते विकास महामंडळाच्याताब्यात मिळाली आहे. त्यात सिन्नर तालुक्यातील ८१ टक्के, तर इगतपुरी तालुक्यातील ९० टक्के जमिनीचा समावेश आहे. परंतु अजूनही १३ टक्के जागाशेतकरी देत नसल्याने शासनाने सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला असून, तशी अंतिम अधिसूचनाही काढण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील बहुचर्चित शिवडे, घोरवडसह आदी गावांमध्ये समृद्धी महामार्गासाठी अनेक दिवस आंदोलनेदेखील झाली. त्यामुळे तेथील जागा मोजणीची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. परिणामी शासनाने दिलेल्या मुदतीत सिन्नर तालुक्यात जागा खरेदी करण्यात विलंब झाल्याने सुमारे ३७५ गटांतील ११०० हून अधिक शेतकºयांना सक्तीच्या भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या शेतकºयांनी संमती दिली तर बाजारभावाच्या पाचपट रक्कम देऊन ती खरेदी केली जाईल, मात्र ज्यांनी जागा दिली नाही, तर ती सक्तीने संपादित करून मोबदल्याची रक्कम थेट न्यायालयात जमा करण्यात येणार आहे. अडसर झाला दूरइगतपुरी या आदिवासी तालुक्यातील बहुतांशी गावे पेसा क्षेत्रातील असल्यामुळे तेथील जागा ताब्यात घेण्यास कायदेशीर बाबींमुळे विलंब झाला होता. आता तो अडसर दूर झाल्याने सोमवारी सक्तीच्या भूसंपादनासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर साधारणत: २०० गटातील ४०० शेतकºयांना नोटिसा देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.