शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:48 IST

तंत्रशिक्षण विद्याशाखेच्या पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महाविद्यालयांना प्राप्त झालेली नसल्याने विद्यार्थ्यांचे स्थलांतर प्रमाणपत्र (ट्रान्सफर सर्टिफिकेट) रोखून अडवणूक करून पालकांक डून शैक्षणिक शुल्कांची मागणी करणाºया महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहे.

नाशिक : तंत्रशिक्षण विद्याशाखेच्या पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीमहाविद्यालयांना प्राप्त झालेली नसल्याने विद्यार्थ्यांचे स्थलांतर प्रमाणपत्र (ट्रान्सफर सर्टिफिकेट) रोखून अडवणूक करून पालकांक डून शैक्षणिक शुल्कांची मागणी करणाºया महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महाविद्यालयांना प्राप्त झालेली नसल्याने महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे स्थलांतर प्रमाणपत्र (ट्रान्सफर सर्टिफिकेट) रोखून अडवणूक होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी (दि.१४) प्रसिद्ध केल्यानंतर समाज कल्याण विभागाने या वृत्ताची गंभीर दखल घेतली आहे़ विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यास संबंधित महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या अधिकारी वैशाली टाके यांनी दिली.तंत्रशिक्षण विद्याशाखेच्या पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेत टीसीअभावी अडसर निर्माण होत आहे.शासनाने महाविद्यालयांनो शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग केली नसल्याने महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क थकीत असल्याचे दाखवत विद्यार्थ्यांचे दाखले रोखले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशाच्या मार्गात अडसरनिर्माण झाल्याने पालकांकडून अडचणीच्या काळात पैशाची जमावाजमव करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्ण करून द्यावे लागत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर अशाप्रकारे विद्यार्थ्यांची अडवणूक करणाºया महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे समाज कल्याण विभागाकडून सोमवारी (दि.१५) स्पष्ट करण्यात आले.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निवेदनशिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांकडून महाविद्यालांनी घेतलेली रक्कम परत करण्याची मागणी करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना निवेदन देऊन संबंधित महाविद्यालयांवर कारवाईची मागणी केली. यावेळी सहायक आयुक्तांच्या अनुपस्थित विभागाच्या अधिकारी वैशाली टाके यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारून यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर सचिव संकेत गायकवाड, धनंजय भालेराव, चेतन क्षीरसागर, योगेश जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.शिष्यवृत्ती मिळण्यास उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी समाज कल्याण विभागातर्फे विशेष परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयScholarshipशिष्यवृत्ती