शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तळघर अस्वच्छ ठेवणाºयांना महापालिकेकडून नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:08 IST

पश्चिम प्रभागात साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून, पालिकेने त्याची दखल घ्यावी यासाठी अस्वच्छ ठिकाणी आरोग्याधिकाºयांची प्रतिमा लावण्याचा इशारा प्रभाग समितीच्या बैठकीत दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. यंत्रणेने तातडीने अस्वच्छ तळघरे ठेवणाºयांना नोटिसा बजावण्यास प्रारंभ केला आहे.

नाशिक : पश्चिम प्रभागात साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून, पालिकेने त्याची दखल घ्यावी यासाठी अस्वच्छ ठिकाणी आरोग्याधिकाºयांची प्रतिमा लावण्याचा इशारा प्रभाग समितीच्या बैठकीत दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. यंत्रणेने तातडीने अस्वच्छ तळघरे ठेवणाºयांना नोटिसा बजावण्यास प्रारंभ केला आहे.गेले दोन महिने शहरात झालेल्या पावसानंतर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. मुख्य रस्त्यांवरील पाण्याचा निचरा झाला असला तरी अनेक व्यापारी संकुले आणि अन्य इमारतींच्या तळघरांमध्ये पाणी साचले असून, त्यात डासांची उत्पत्ती होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम प्रभागाच्या समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा करण्यात आली. आरोग्य विभाग अशाप्रकारे साचलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच डासांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करण्यात आला. त्याचप्रमाणे त्वरित स्वच्छ न केल्यास आरोग्याधिकाºयांचे छायाचित्र लावण्याचा इशारा प्रभाग समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी दिला होता. दरम्यान, या प्रकारानंतर महापालिकेच्या पश्चिम विभागाने आरोग्याधिकाºयांवरील संकट टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, खासगी मिळकतीत पाणी साचले असेल अशा मिळकती शोधून नोटिसा दिल्या जात आहेत. गुरुवारी सभापती डॉ. पाटील आणि सदस्यांनी या नोटिसींचा आढावा घेतला. आरोग्य विभागाला सुधारणा करण्यासाठी आणखी तीन ते चार दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर जेथे अस्वच्छता आणि साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होतांना आढळेल अशा ठिकाणी आरोग्याधिकाºयांची छबी असलेले बॅनर्स लावण्यात येणार आहे. त्यासाठी बॅनर्सही तयार करण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.