शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीला नोटीस

By admin | Updated: May 23, 2017 01:41 IST

नाशिक : सर्वेक्षणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याबद्दल महापालिकेने संबंधित एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील मिळकतींचा जिआॅग्राफिकल सर्व्हे करण्याचे काम खासगी एजन्सीमार्फत गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असले तरी सर्वेक्षणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याबद्दल महापालिकेने संबंधित एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. महापालिकेने शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतचे काम नवी दिल्ली येथील जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजिक्स या कंपनीला सहा महिन्यांसाठी देण्यात आले आहे. सदर कंपनीने १९ डिसेंबर २०१६ पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला प्रारंभ केला. सध्या महापालिकेच्या दप्तरी चार लाख दहा हजार मिळकतींची नोंद आहे. जिआॅग्राफिकल सर्व्हेच्या माध्यमातून त्यात १५ ते २० टक्के मिळकतींची संख्या वाढण्याची अपेक्षा महापालिकेला आहे. सर्व्हेमध्ये प्रामुख्याने वाढीव बांधकामे, अनधिकृत बांधकामे, वापरात बदल, भाडेकरू, टॅक्सनेटमध्ये नसलेल्या मिळकती यांचा शोध घेतला जात आहे. सदर सर्वेक्षणासाठी १५० जणांचे पथक तैनात केले जाणार होते. प्रत्येक पथकात दोन सदस्यांचा समावेश होता.  प्रतिपथकामार्फत प्रतिदिन ३० ते ३५ मिळकतींची माहिती संकलित केली जाणार असल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी आयुक्तांसमोर केलेल्या सादरीकरणात दिली होती. दरम्यान, सोमवारी (दि.२२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापतींनी मिळकत सर्वेक्षणाची सद्यस्थितीची विचारणा केल्यानंतर उपआयुक्त दोरकुळकर यांनी सांगितले, सध्या पश्चिम, सिडको व सातपूर विभागात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ६० हजार मिळकतींचे सर्वेक्षण झाले आहे. मात्र, ती संख्या अडीच लाखांच्या आसपास जायला हवी होती. संबंधित एजन्सीला १८० दिवसांची मुदत सर्वेक्षणासाठी दिलेली आहे. संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांच्या आदेशान्वये पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही दोरकुळकर यांनी स्पष्ट केले. यावेळी सभापतींनी मुदतीत काम पूर्ण करण्याचे आदेशित करतानाच काम पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाईचाही इशारा दिला. मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही सभापतींनी स्पष्ट केले.२२ कोटींची घरपट्टी वसूलमहापालिकेमार्फत घरपट्टीसाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी सवलत योजना सुरू आहे. मे महिन्यात ३ टक्के तर जून महिन्यात २ टक्के बिलात सवलत दिली जाणार आहे. गेल्या दीड महिन्यात आतापर्यंत २२ कोटी रुपयांची घरपट्टी वसूल झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ७४ टक्के वसुली झाली असल्याची माहिती उपआयुक्त दोरकुळकर यांनी दिली. यावेळी सभापतींनी शंभर टक्के वसुलीवर भर देण्याचे सांगतानाच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचेही स्पष्ट केले.