शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दुसरे धनादेश देण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:51 IST

तुम्ही शेतकºयांना दिलेल्या धनादेशाचे कुरियर हरवले असल्याने संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा इतर मार्गाने पैसे अदा करावेत असे पत्र राजापूरच्या महाराष्ट्र बँकेने धनादेश देणाºया व्यापाºयांना दिले आहे. यामुळे धनादेश हरवले बँकेने पण दुसरा धनादेश मिळविण्यासह पैशांसाठी शेतकºयांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

राजापूर : तुम्ही शेतकºयांना दिलेल्या धनादेशाचे कुरियर हरवले असल्याने संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा इतर मार्गाने पैसे अदा करावेत असे पत्र राजापूरच्या महाराष्ट्र बँकेने धनादेश देणाºया व्यापाºयांना दिले आहे. यामुळे धनादेश हरवले बँकेने पण दुसरा धनादेश मिळविण्यासह पैशांसाठी शेतकºयांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.  राजापूर येथे महाराष्ट्र बँकेची शाखा असून, राष्ट्रीयीकृत असलेली एकमेव बँक या परिसरात असल्याने पाच ते सहा गावांतील शेतकºयांचे आर्थिक व्यवहार येथून चालतात. शेतमाल विक्रीसह इतर खासगी व्यवहारांचे धनादेशदेखील शेतकरी व इतर ग्रामस्थ येथेच वटणावळीसाठी जमा करतात. नेहमीप्रमाणे येथे जमा झालेले शेतकºयांचे सुमारे १७ लाखांच्या रकमेचे ४२ धनादेश राजापूर शाखेचे व्यवस्थापक देशमुख यांनी येवला येथील सोमाणी कुरियरकडे ९ एप्रिल रोजी कुरियर करण्यासाठी दिले. हे टपाल येवल्यातून नाशिक येथील सोमाणी कुरियरकडे पाठवले होते. मात्र, सोमाणी कुरियरने हे टपाल टिळकरोड येथील सर्व सेवा शाखा बँकेत देण्याऐवजी गडकरी चौक येथील बँक आॅफ महाराष्ट्र मुख्य कार्यालयात जमा केल्याचे तपासात उघड झाले आहे. या बेचाळीस शेतकºयांना ज्यांनी चेक दिले त्यांना उद्देशून दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण दिलेला धनादेश आपल्या बँक खात्यातून वटणावळ झाला की नाही ते पाहावे. नाहीतर संबंधितांना नव्याने धनादेश द्यावा किंवा रोख व इतर मार्गाने पैसे देण्यात यावे, अशी विनंती बँकेने या पत्राद्वारे केली आहे. वास्तविक या सगळ्या प्रकारात कुठलाही दोष नसताना धनादेश बँकेत जमा केलेले शेतकरी मात्र मनस्ताप सहन करत असून आता दुसरा धनादेश किंवा पैसे मिळविण्यासाठी त्यांना वारंवार चकरा माराव्या लागणार आहेत.

टॅग्स :bankबँक