नाशिक : जुने नाशिक परिसरातील माजी नगरसेवक मुशीर सय्यद यास पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे़ विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्'ांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे़ हाणामारी, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न यांसह अनेक गुन्'ांची नोंद मुशीर सय्यदवर आहे़ शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांनी मुशीर यास तडीपारीची नोटीस बजावली आहे़ शुक्रवारी रात्री ही नोटीस मुशीर सय्यदच्या घरावर चिकटविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़(प्रतिनिधी)
माजी नगरसेवक मुशीर सय्यदला तडीपारीची नोटीस
By admin | Updated: November 30, 2014 00:33 IST