शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नोट प्रेसमध्ये कामकाज सुरळीत; मात्र संपाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:37 IST

केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारत प्रतिभूती-चलार्थपत्र मुद्रणालय मजदूर संघाच्या वतीने देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून दुपारच्या सुटीत निदर्शने करत केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही प्रेसमध्ये कामकाज सुरळीत सुरू होते.

केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आयएसपी गेट येथे निदर्शने करताना जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, सुनील आहिरे, राजेश टाकेकर, चंद्रकांत हिंगमिरे, इरफान शेख, कार्तिक डांगे, उत्तम रकिबे, शिवाजी कदम, जयराम कोठुळे आदी.नाशिकरोड : केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारत प्रतिभूती-चलार्थपत्र मुद्रणालय मजदूर संघाच्या वतीने देशव्यापी संपाला पाठिंबा म्हणून दुपारच्या सुटीत निदर्शने करत केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही प्रेसमध्ये कामकाज सुरळीत सुरू होते.केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी देशातील मान्यताप्राप्त संघटनांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला होता. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याने प्रेस कामगारांना संपात सहभागी होता आले नाही. मात्र या संपास पाठिंबा म्हणून हिंद मजदूर सभेशी संलग्न असलेल्या आयएसपी मजदूर संघाने दुपारी जेवणाच्या सुटीत आयएसपी गेट युनियन आॅफिस येथे निदर्शने करीत केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे म्हणाले की, केंद्र शासनाने कामगार विरोधी कायदे रद्द केले पाहिजे. देशभर कामगार विरोधी धोरण राबविले जात आहे. आरबीआयच्या व सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कॉईन्स व करन्सी क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योगांचे अस्तित्वच धोक्यात येऊ पाहात आहे. तेव्हा या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे गोडसे यांनी सांगितले. या मागण्यांबाबतचे निवेदन आयएसपी व सीएनपी मुद्रणालयाचे महाप्रबंधक यांना देण्यात आले. निदर्शने आंदोलनात मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष सुनील आहिरे, महाराष्टÑ राज्य हिंद मजदूर सभेचे उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, उत्तम रकिबे, शिवाजी कदम, जयराम कोठुळे, इरफान शेख, रमेश खुळे, गौतम थोरात, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, नंदू कदम, साहेबराव गाडेकर, भीमा नवाळे, अण्णा सोनवणे, विनोद लोखंडे, राजू जगताप, मनिष कोकाटे, ज्ञानेश्वर गायकवाड सहभागी झाले होते.

टॅग्स :Strikeसंप