शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

...नाही सहन होत या व्यथा ! सोशल मिडियावर रंगला संप

By admin | Updated: June 1, 2017 21:27 IST

काळ्या आईच्या उदरात पेरलय बान-बियान अन् निसर्गाकडे लागलयं बाच मन.. पावसाचं करतोय ध्यान आता सारी कोरडीच माती नाही दिसत बियांचं मोड नाही दिसत हिरवं शिवार शेत पडलं ओसाड..

नाशिक : ‘काळ्या आईच्या उदरात पेरलय बान-बियान अन् निसर्गाकडे लागलयं बाच मन.. पावसाचं करतोय ध्यान आता सारी कोरडीच माती नाही दिसत बियांचं मोड नाही दिसत हिरवं शिवार शेत पडलं ओसाड...किती सांगू शेतकरी बाबाच्या कथा नाही सहन होत या व्यथा...’ अशा एक ना अनेक प्रकारच्या कविता, शायरी, शेतकऱ्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून गुरूवारी दिवसभर सोशल मिडिया गहिवरला. देशाच्या अन् राज्याच्या इतिहासात प्रथमच बळीराजाने संप पुकारल्यामुळे शहरवासीयांचे हाल झाले आणि सरकारी यंत्रणाही हादरून गेली. या संपाबाबत अनेकांनी आपली मते सोशल मिडियावर मुक्तपणे मांडली. काहींनी शेतकऱ्यांचा संप गरजेचा होता, सरकारने अंत बघितला अन् संयमांचा बांध अखेर फुटला अशा प्रतिक्रिया नोंदविल्या तर काहींनी मात्र शेतकऱ्यांनी संप केला यास हरकत नाही मात्र शेतमालाची केलेली नासाडी बघवत नसल्याचेही अधोरेखित केले.

 

 

गुरूवारी मध्यरात्रीपासून सोशल मिडियावर नेटीझन्स सक्रिय झाले होते. दिवसभर नेटीझन्सनी शहरासह जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या संपाबाबतच्या बातम्या, छायाचित्रे, चित्रफित सोशल मिडियावर पोस्ट केले. अनेकांनी बळीराजाचे व जनतेचे आभारही मानले.