नाशिकरोड : युनायटेड किंग्डम येथील रोल्स रॉईस घोस्ट या कंपनीची अत्यंत महागडी व प्रचंड सुरक्षित सहा कोटी रुपयांची कार गारगोटी संग्रहालयाचे निर्माते व नाशिकरोड येथील रहिवासी के. सी. पांडे यांनी खरेदी केली आहे. या कंपनीची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. पुढील महिन्यात पांडे यांच्या मुलाचे लग्न आहे. या लग्नानिमित्त पांडे यांनी दुर्गाष्टमीचा योग साधून युनायटेड किंग्डम येथील रोल्स रॉईस घोस्ट या कंपनीची कार खरेदी केली आहे. गेल्या ४० दिवसांपूर्वी युकेहून जहाजामधून निघालेली ही कार मुंबईत आल्यानंतर शुक्रवारी एका कंटेनरमधून सायंकाळी नाशिकरोडला आणण्यात आली. सायंकाळी पांडे यांच्या मातोश्री शांती श्यामसुंदर पांडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी कार बघण्यासाठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे युकेपेक्षा १७४ टक्के जास्त आयात शुल्क या कारसाठी पांडे यांना मोजावे लागले आहे. यावेळी कुलीनकृष्ण पांडे, आयसीआयसीआय बॅँकेचे हार्दिक पटेल, समीर पाटील, रघुनाथ सिसोदिया आदि उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्रातील पहिली ‘रोल्स रॉईस’ नाशकात
By admin | Updated: March 28, 2015 00:49 IST