शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी सावकारीच्या पाशात गुरफटले सर्वसामान्य मालेगावकर

By admin | Updated: January 17, 2016 21:59 IST

खासगी सावकारीच्या पाशात गुरफटले सर्वसामान्य मालेगावकर

मालेगाव : शहरात मोठ्या प्रमाणावर खासगी पातळीवर व्याजाने पैसे देण्याचा गोरख धंदा केला जात असून, या खासगी सावकारीने शहरातील अनेकजण रस्त्यावर आल्याची चर्चा रंगली आहे. पोलिसांनी अशा सावकारांना पायबंद घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाने बँकांना कर्ज देण्याचे बंधन घातले असले तरी जवळपास सर्वच बँकांमध्ये वशिला असलेल्यांना किंवा ओळखीच्या नागरिकांना कर्ज दिले जात असून, सर्वसामान्यांना कर्ज दिले जात नाही. त्यामुळे हा व्यवसाय फोफावला आहे. याउलट हे खासगी सावकार मालमत्तेच्या तारणावर सहज पैसे देतात. त्यामुळे अडलेल्यांना नाईलाजाने यांचा आसरा घ्यावा लागत आहे. यात काहीजण अडलेल्या मदत म्हणून हा व्यवसाय करत असले तरी काहीजण समोरच्याची मालमत्ता लाटण्याच्या उद्देशाने हा धंदा करत असल्याचे बोलले जाते. या व्यवसायात सध्या महिन्याला १५ ते २० टक्के दराने व्याजाने पैसै वाटले जात असल्याची माहिती आहे. यात काहीजण दिवसभरात पैशाची नड असलेल्यांचा शोध घेतात. मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्याशी जवळीक साधत त्याला व्याजाने पैसे देणाऱ्यांशी गाठी-भेटी घालून देतात व त्याला पैसे घेण्यास भरीस पाडण्याचे काम ही काहीजण करतात. एकदा का त्याने पैसे घेतले की त्याला पूर्णपणे धुळीस मिळविण्याचे प्रकार केले जात आहे. या बदल्यात नाममात्र पैशावर अवाच्या सव्वा व्याज लावून तीन ते चार पटीने वसुली केली जात आहे.या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर दादागिरी केली जात असून, मुद्दल व व्याजापोटी घरातील चिजवस्तू, वहाने, टीव्ही आदिंसारख्या मौल्यवान वस्तू उचलून नेण्याबरोबरच घरादारावर गंडांतर आणले जात आहे. काहीजण पैसै घेणाऱ्याने व्याजासह पैसे दिले तरी तारण म्हणून दिलेली मालमत्ता हडप करत असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. या विरोधात तक्रार करणारा मारहाणीच्या व जीविताच्या भीतीने पोलिसांत तक्रार करत नाही. एवढे होऊनही एखाद्याने तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विविध मार्गांनी छळ करत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तक्रार करण्यापेक्षा स्वत:च्या नशिबाला दोष देत बसावे लागते. या खासगी सावकारीमुळे काहींनी आत्महत्त्या केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी असा व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)