लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पावसाअभावी भाज्यांची कमी झालेली आवक, आहे त्या भाज्यांचे चढे दर, जीएसटीच्या गोंधळामुळे महागाईचा गोंधळ यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले असून, किमान परवडतील अशा दरात भाज्या कधी मिळतील याची प्रतीक्षा आता सर्वांना लागून राहिली आहे. भाज्यांच्या भावात दुपटी-तिपटीने वाढ झाल्याचे दिसते आहे. भाजीविक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहक यांना भाववाढीचा सामना करावा लागत असून, भाव कमी झाले नाही तर परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. सर्वच भाज्या महागपूर्वीचे दर आताचे दरवांगे-४० ते ५०७० ते ८०गवार- ५० ते ६०८० ते ९०भेंडी- ३० ते ४०६० ते ७०पालक- १० ते १२१५ ते २०मेथी- ५ ते १०२५ ते ३०शेपू- १० ते १५१५ ते ३०कोबी प्रति नग - १५ ते २० २० ते २५फ्लॉवर प्रति नग - १५ ते २० २० ते २५डांगर- १५ ते २० ४० ते ५०सिमला- २० ते ३०६० ते ७०वाल- ३० ते ४०६० ते ७०दुधीभोपळा- १० ते १२ २० गिलके- ५० ते ६०८० ते ९०दोडके- ५० ते ६०८० ते ९०कारले- ४० ते ५० ६० ते ७०टमाटे- ४० ते ५०६० ते ७०हिरवी मिरची- ५० ते ६० ६० ते ७०बटाटे- १० ते १५२५ ते ३०
भाज्या महागल्याने सर्वसामान्य हवालदिल
By admin | Updated: July 17, 2017 00:22 IST