शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी राष्टÑवादीकडून सहाणे यांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:33 IST

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी बुधवारी राष्ट्रवादी कॉँगे्रसच्या वतीने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले शिवाजी सहाणे यांनी नामांकन दाखल केले. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी अंतिम मुदत असून, शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत रंगणार आहे.

ठळक मुद्देआज शेवटचा दिवस : नरेंद्र दराडे करणार अर्ज दाखलराष्टÑवादी विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत रंगणार

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी बुधवारी राष्ट्रवादी कॉँगे्रसच्या वतीने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले शिवाजी सहाणे यांनी नामांकन दाखल केले. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी अंतिम मुदत असून, शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत रंगणार आहे.शिवसेनेकडून गेल्या वेळी शिवाजी सहाणे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढविली होती. समसमान मते मिळाल्याने या निवडणुकीत राष्टÑवादीचे जयंत जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले होते. तेव्हापासूनच सहाणे यांच्याकडून विधान परिषदेवर दावा सांगितला जात असताना पक्षाने मात्र ऐनवेळी जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करून सहाणे यांची पक्षातून हकालपट्टी केली. सहाणे यांनी मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करून उमेदवारीसाठी भाजपा व राष्टÑवादीकडे प्रयत्न चालविले होते. त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. राष्टÑवादी कॉँग्रेसकडेही सक्षम उमेदवार नसल्याने त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी वरिष्ठ पातळीवरून सूत्रे फिरली व शिवाजी सहाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सहाणे यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.दुपारी दोन वाजता शिवाजी सहाणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांच्याकडे आपले नामांकन दाखल केले. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जयंत जाधव, आमदार अपूर्व हिरे, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, दिलीप बनकर, श्रीराम शेटे, गजानन शेलार आदी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. गुरुवारी निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस असून, शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे अर्ज दाखल करणार आहेत.