शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मनपा इन्क्युबेटर्स वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:33 IST

आयुक्त : विनाकारण सिव्हिलला रुग्ण पाठविल्यास कारवाई नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नवजात अर्भकांवर उपचार करावे लागत असल्याने आॅगस्ट महिन्यात ५५ बालके दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनही या प्रकाराने सावध झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीत १७ इन्क्युबेटर्स असून, त्यात आणखी २३ इन्क्युबेटर्सची भर घालणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आयुक्त : विनाकारण सिव्हिलला रुग्ण पाठविल्यास कारवाई

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नवजात अर्भकांवर उपचार करावे लागत असल्याने आॅगस्ट महिन्यात ५५ बालके दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनही या प्रकाराने सावध झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीत १७ इन्क्युबेटर्स असून, त्यात आणखी २३ इन्क्युबेटर्सची भर घालणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिकेच्या रुग्णालयातून विनाकारण शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण पाठविले जात असतील तर संबंधित वैद्यकीय अधिकाºयापासून वैद्यकीय अधीक्षकांपर्यंत कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला.जिल्हा शासकीय रुग्णालयात एका इन्क्युबेटरमध्ये चार-चार नवजात अर्भके कोंबण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर त्याबाबत खळबळ उडाली. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि जिल्हा रुग्णालयात इन्क्युबेटर्सची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले. जिल्हा रुग्णालयाच्या या स्थितीमुळे महापालिकेनेही सावधगिरी बाळगत आपल्या रुग्णालयांमधील इन्क्युबेटर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या १७ इन्क्युबेटर्स आहेत. त्यात बिटको रुग्णालयात १०, कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ४, इंदिरा गांधी रुग्णालयात २, तर स्वामी समर्थ रुग्णालयात १ इन्क्युबेटर आहे. आता त्यात आणखी २३ इन्क्युबेटर्स वाढविण्यात येणार आहेत. त्यामध्ये बिटकोत ३, झाकीर हुसेन रुग्णालयात ४, इंदिरा गांधी रुग्णालयात ६, मोरवाडी येथील रुग्णालयात ६, मायको दवाखान्यात २, तर जिजामाता रुग्णालयात २ इन्क्युबेटर्सची संख्या वाढविली जाणार आहे. महापालिका रुग्णालयात इन्क्युबेटर्स रिकामे असताना विनाकारण जिल्हा रुग्णालयात नवजात अर्भक पाठविण्याचा प्रकार समोर आल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाºयासह वैद्यकीय अधीक्षकावरही कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.आॅगस्टमध्ये पाठविले २२ अर्भकजिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांमधून मोठ्या प्रमाणावर नवजात अर्भक इन्क्युबेटर्समध्ये ठेवण्यासाठी पाठविले जात असल्याचा आरोप केला जातो आहे. त्या आरोपांचा स्पष्ट शब्दात इन्कार करत आयुक्तांनी सांगितले, आॅगस्ट महिन्यात जिल्हा रुग्णालयात १२९ नवजात अर्भक दाखल झाले. त्यातील केवळ २२ अर्भक हे महापालिका रुग्णालयांतून पाठविण्यात आलेले आहेत, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातून ३३, ग्रामीण रुग्णालयातून ५२, उपविभागीय रुग्णालयातून १६, तर खासगी रुग्णालयातून ६ नवजात अर्भक दाखल झालेले होते. महापालिकेच्या बिटको रुग्णालयावर ग्रामीण भागातील रुग्णांचा भार वाढत असल्याचेही यावेळी आयुक्तांनी सांगितले.