शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडच्या मतदारांची सिडको मतदार यादीत नावे

By admin | Updated: January 24, 2017 00:53 IST

सिडको प्रभाग क्र. २४ : अंतिम यादीतील घोळ कायम

सिडको : महानगरपालिकेने फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादी आणि पुरवणी यादीत प्रभाग क्र. २४ च्या मतदार यादीत घोळ असल्याबाबत अनेकांसह शिवसेनेचे नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनीही हरकती घेतल्या होत्या. मात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही घोळ कायम आहे. विशेष म्हणजे अंतिम यादीत नाशिककरोडच्या मतदारांची नावे सिडकोतील मतदार यादीत टाकण्यात आली आहेत. यामुळे अंतिम यादीतही घोळ कायम असल्याचे बोलले जात आहे.  प्रारूप मतदार यादीत देवळाली मतदारसंघातील नावे समाविष्ट झाली असल्याने व प्रभागात राहणाऱ्या शेकडो मतदारांची नावे अन्य प्रभागांत टाकण्यात आली आहेत. तसेच सोळाशेहून अधिक मतदारांची केवळ आडनावे प्रसिद्ध करण्यात आली होती.  याबाबत प्रवीण तिदमे यांनी हरकत घेतली. यात प्रभाग २४ हा नाशिक पश्चिम विधानसभा (क्र. १२५) मतदारसंघात येतो. असे असताना प्रारूप यादीत देवळाली विधानसभा (क्र. १२६) मधील मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.  तसेच प्रभागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांची नावे वेगवेगळ्या प्रभागात टाकण्यात   आली आहेत. प्रभाग २४ मध्ये राहत असूनही एकाच कुटुंबांतील मतदारांचे प्रभाग २५, तर काहींची प्रभाग २९ मध्ये नावे अशाप्रकारे  घोळ घालण्यात आला आहे. विधानसभा यादीत मतदारांचे संपूर्ण नाव असताना प्रारूप यादीत सुमारे १६५३ हून मतदारांचे  केवळ आडनावेच प्रसिद्ध करण्यात आली होती. अशा अनेक तक्रारींबाबत प्रवीण तिदमे  यांनी हरकती घेतल्या आहेत. (वार्ताहर)