शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुले, बाल कामगारांप्रती शिक्षण विभाग उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 01:41 IST

शहर असो किंवा ग्रामीण परिसर, दिवसागणिक बालमजुरीचा प्रश्न गुंतागुंतीचा होत चालला आहे. कुटुंबाला अर्थसहाय्य करता यावे यासाठी अल्पवयीन मुले शिक्षण अर्धवट सोडून मजुरी, घरकामगार किंवा किरकोळ स्वरूपातील काही कामे करत आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प प्रयत्नशील आहे. परंतु, शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे अशा बाल कामगार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक पाठ्यपुस्तक ांसोबतच शाळाबाह्य मुलांची वास्तविक माहिती उपलब्ध होत नसल्याने हजारो मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहात असल्याने शिक्षण विभागाची बाल कामगार व शाळाबाह्य मुलांप्रती असलेली उदासीनता दिसून येत आहे.

ठळक मुद्देबाल कामगार प्रकल्पाचा आरोप : शैक्षणिक पाठ्यपुस्तक ांसाठी करावी लागते विनवणी

नाशिक : शहर असो किंवा ग्रामीण परिसर, दिवसागणिक बालमजुरीचा प्रश्न गुंतागुंतीचा होत चालला आहे. कुटुंबाला अर्थसहाय्य करता यावे यासाठी अल्पवयीन मुले शिक्षण अर्धवट सोडून मजुरी, घरकामगार किंवा किरकोळ स्वरूपातील काही कामे करत आहेत. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प प्रयत्नशील आहे. परंतु, शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे अशा बाल कामगार मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक पाठ्यपुस्तक ांसोबतच शाळाबाह्य मुलांची वास्तविक माहिती उपलब्ध होत नसल्याने हजारो मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहात असल्याने शिक्षण विभागाची बाल कामगार व शाळाबाह्य मुलांप्रती असलेली उदासीनता दिसून येत आहे.जुन्या कायद्यानुसार धोकादायक आणि असुरक्षित अशी विभागणी करत १८ उद्योग आणि ५७ व्यवसाय प्रक्रियांमध्ये काम करण्यास बालकांना बंदी करण्यात आली होती. नव्या कायद्यानुसार ही व्याप्ती वाढविण्यात आली असून, धोकादायक किंवा असुरक्षित अशी विभागणी न करता शाळाबाह्य तसेच कुठल्याही प्रकारचे काम करणाऱ्या १४ वर्षांआतील बालकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा बालकांचा शोध घेण्याचे आवाहन आता राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पासमोर आहे.परंतु जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची वास्तविक माहिती वेळेत मिळू शकत नसल्याने हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचितराहतात.शिक्षण विभागाचे सहकार्य मिळत नसल्याने बाल कामगार प्रकल्पाला जिल्हा स्तरावर समाजकार्य महाविद्यालयांची मदत घेऊन बाल कामगारापर्यंत तसेच शाळाबाह्य मुलांपर्यंत पोहोचावे लागत असल्याने डिसेंबरपर्यंतही सर्वेक्षणाचे काम करावे लागत आहे. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यासावर होत आहे.३0 ते ४0 केंद्रे सुरू होण्याची शक्यताबाल कामगारांसाठी गेल्या वर्षी जिल्ह्यात ३० विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू होती. परंतु यावर्षी अद्याप सर्वेक्षणच सुरू असल्याने केवळ ६ प्रशिक्षण केंद्रेच सुरू होऊ शकली असून यातील बहूतांश केंद्रे मालेगाव भागात आहेत. ही संख्या यावर्षीही ३० ते ४० केंद्रांपर्यंत जाण्याची शक्यता राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे संचालक जयप्रकाश देशमुख यांनी व्यक्त केली आहे. पूर्वी किमान ५० बालकांसाठी केंद्र सुरू करता येत होते. केंद्र सरकारने ही अट शिथिल केल्याने जिल्हा परिसरात ठिकठिकाणी किमान २० बालकांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रchildren's dayबालदिन