शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शिक्षण मंडळ भरविणार ‘नापासांची शाळा’

By admin | Updated: August 27, 2016 22:51 IST

उपक्रम : १३६ मुलांचे उजळणार भवितव्य; महापालिका शाळांमध्ये रोज भरणार वर्ग

नाशिक : महापालिका शिक्षण मंडळाने मागील आठवड्यात राबविलेल्या शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत नववीत नापास झाल्याने शाळेलाच रामराम ठोकणारी १३६ मुले आढळून आली आहेत. या मुलांना आता पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी मनपा शाळांमध्ये रोज सायंकाळी ‘नापासांची शाळा’ भरविण्याचा उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. मनपा शिक्षण मंडळाने मागील आठवड्यात मोबाइल अ‍ॅपमार्फत नोंद घेत १२६८ शाळाबाह्य मुले आढळून आली होती. यामध्ये सर्वाधिक मुले पंचवटी विभागात आढळून आली. दरम्यान, शाळाबाह्य मुलांच्या या शोधमोहिमेत नववीमध्ये नापास झाल्याने शाळाच सोडून देणारे १३६ मुले आढळून आली. अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा कशाप्रकारे आणता येईल यादृष्टीने शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी अशा मुलांसाठी शाळाच भरविण्याचा विचार पुढे आणला. सदर मुलांसाठी जवळच्या मनपा शाळांमध्ये रोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत वर्ग भरविण्यात येईल. या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी सेवाभावी, सेवानिवृत्त शिक्षकांना आवाहन केले जाईल. त्यांच्यामार्फत मुलांची पुन्हा शाळा भरविण्यात येईल. सदर मुलांची दहावीची तयारी करून घेतल्यानंतर १७ नंबरचा फार्म भरत त्यांना दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट करण्यात येईल. दहावी उत्तीर्ण झाल्यास या मुलांना पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त व प्रोत्साहित केले जाईल. (प्रतिनिधी)