नाशिक : नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असूनही छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याच्या निषेधार्थ युवा सेनेच्या वतीने मेनरोडवरील संत गाडगेमहाराज चौकात नायलॉन मांजाची होळी करण्यात आली.नायलॉन मांजावर कायमस्वरुपी बंदी घालण्याबाबत युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना १५ दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. शासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसार बंदी घातली आहे, परंतु शहरात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ नायलॉन मांजाची होळी करण्यात आली. यावेळी ‘नायलॉन मांजा हद्दपार करू या’ असे फलक झळकवत जनजागृती करण्यात आली. यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक सचिन बांडे, उमेश चव्हाण, विधानसभा प्रमुख सुनील जाधव, समन्वयक अमोल सूर्यवंशी, शहर सरचिटणीस जयदीप सूर्यवंशी, गोकुळ मते, अंकुश राऊत, पृथ्वीराज अंडे, विशाल पगारे, गौरव देशमुख, करण राजपूत, अतुल क्षीरसागर, अजय राजपूत, कमलेश नागपुरे आदि उपस्थित होते.
युवा सेनेतर्फे नायलॉन मांजाची होळी
By admin | Updated: January 10, 2016 23:36 IST