शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहनचालकांचा घुमतोय पिंपळगाव बसस्थानकात आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:17 IST

स्थानकात वेळेवर बसेस येत नसल्याने प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहनचालक स्थानकात प्रवेश करत प्रवासी पळवून नेत आहे. बसस्थानकात बसेसपेक्षा खासगी वाहनांची रेलचेल दिसत येत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देऊन नादुरुस्त बसेस दुरुस्त करत त्या वेळेवर सोडण्याची मागणी सर्वसामान्य प्रवाशांनी केली आहे.

ठळक मुद्देआर्थिक भुर्दंड । राज्य परिवहन महामंडळाचे सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष

पिंपळगाव बसवंत : येथील स्थानकात वेळेवर बसेस येत नसल्याने प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहनचालक स्थानकात प्रवेश करत प्रवासी पळवून नेत आहे. बसस्थानकात बसेसपेक्षा खासगी वाहनांची रेलचेल दिसत येत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देऊन नादुरुस्त बसेस दुरुस्त करत त्या वेळेवर सोडण्याची मागणी सर्वसामान्य प्रवाशांनी केली आहे.येथील स्थानकात बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे संधी साधून खासगी वाहनचालक स्थानकात एन्ट्री घेतात. ‘चलो नाशिक, चलो नाशिक’ची आरोळी देत प्रवासी पळवतात. बसेसच उपलब्ध नसल्याने अनेकांना नाइलाजाने खासगी वाहनांमध्ये जीवघेणा प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागातील जीवनवाहिनी’ असे जिचे वर्णन केले जाते, त्या एसटीची अवस्था तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करतानादेखील कठीण आहे.निफाड तालुक्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे तालुक्याला जाणाऱ्या बसेसचे तीन तेरा वाजले आहेत. या बसेस कधीच वेळेवर पोहोचत नाहीत. त्यामुळे बेकायदा प्रवासी वाहतूक करणाºया खासगी वाहनांचा प्रवाशांना आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना असुरक्षित प्रवास करावा लागत असून, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे बिरुद मिरवणारी एसटी ग्रामीण भागात प्रवाशांसाठी बिनभरवाशाची ठरत आहे.पिंपळगाव शहरातील नोकरदारांना, ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी एसटी बस हा चांगला पर्याय आहे. मात्र अनेकदा वेळेवर गाडीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मासिक पासधारक प्रवासी, शेतकरी, नोकरदार व सवलतीच्या दराने प्रवास करणाºया विद्यार्थ्यांना नाहक फटका बसतो. त्यांच्याकडे खासगी वाहतूक करणाºया वाहनांशिवाय दुसरा पर्याय नसतो. शहरातून जवळपास हजारो प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. मात्र वेळेवर बस नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करून इच्छित स्थळ गाठावे लागते. त्यामुळे नादुरुस्त बसेसची दुरुस्ती करून त्या वेळेवर सोडाव्यात, अशी मागणी जोर प्रवाशांनी केली आहे.पिंपळगाव स्थानकात वेळेवर बस येत नाही व टोल नाक्यावरील अवाच्या सव्वा टोल वसुलीमुळे वर्षभरात आगाराला १२ लाख रु पयांचा टोल भरावा लागला आहे. उत्पन्न कमी आणि टोलची रक्कम अधिक यामुळे महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाने या बाबीचा गांभीर्याने विचार करून ग्राहकसेवा पुरविण्यावर भर देण्याची गरज आहे. बसस्थानकातून प्रवासी घेऊन जाण्याला जबाबदार कोण, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- मयूर गावडे, सामाजिक कार्यकर्ते पिंपळगाव बसवंतबस वेळेवर येत नसल्याने नाइलाजाने खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. बसेस वेळेवर आल्या आणि त्या अद्ययावत असला तर प्रवास सुखकारक होईल.

- रमेश गायकवाड, प्रवासी

टॅग्स :Bus Driverबसचालक