शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गृह विलगीकरणातील रुग्णांवर नाही कोणत्याच यंत्रणेचे लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाने पुन्हा कहर सुरू केला असताना ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांकडून ...

नाशिक : कोरोनाने पुन्हा कहर सुरू केला असताना ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांकडून गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला जात आहे. मात्र, गृहविलगीकरणात असणारे अनेक बाधित तसेच काहींचे कुटुंबीयदेखील कोणतीही बाधा नसल्याप्रमाणे मुक्त संचार करीत असतात. गृहविलगीकरणातील या रुग्णांवरील यंत्रणेचे लक्ष नगण्य असल्याने जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने गृहविलगीकरणातील रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हे चिंतेचा विषय ठरू शकतात.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून, वाढती संख्या पाहता ज्यांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांकडून गृहविलगीकरणालाच प्राधान्य दिले जात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच राहून या माध्यमातून उपचार घेण्याची मुभादेखील रुग्णांना आहे. काही लोक खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतात. मात्र, हे करताना गृहविलगीकरण म्हणजे नेमके काय, याचे भान ते विसरून जातात. अनेकांना बाधा असूनही थोडे बरे वाटल्यानंतर अवघ्या तिसऱ्या , चौथ्या दिवशीदेखील ते मुक्तपणे संचार करू लागतात. अशा गृहविलगीकरणातील रुग्णांच्या संपर्कामुळेच अन्य नागरिक बाधित होण्याचा संभव अधिक आहे. सुरुवातीच्या काळात विलगीकरणात ठेवल्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून नियमित दररोज अशा लोकांचा आढावा घेतला जात होता. त्यांच्या घरावर विलगीकरणाचे स्टीकर्स लावले जात होते; परंतु आता यापैकी एकही यंत्रणा संबंधित रुग्ण खऱ्या अर्थाने विलगीकरणात आहे का, हे जाणून घेण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसत नाही. रुग्णांची संख्या अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने यंत्रणादेखील अपुरी पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

-------------

इन्फो

८० टक्के नागरिकांचे घरीच उपचार

बाधित झाल्यानंतर घरीच राहून उपचार घेण्याचा पर्याय ८० टक्क्यांहून अधिक बाधित निवडत आहेत. मात्र, या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेचे कितपत लक्ष आहे किंवा रुग्ण स्वतः इतर नागरिकांच्या आरोग्याबाबात विचार न करता बेशिस्तपणे सामान्य व्यक्तीप्रमाणे लोकांमध्ये वावरताना दिसतात. स्वतःचा आजार बरा झाल्याच्या भ्रमात आठवड्याच्या आतच बाहेर फिरण्यास प्रारंभ करीत असल्याने इतर लोकांचे आरोग्य धोक्यात टाकत आहेत.

--------------