शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

वन्यजीव कायद्यात नाही नुकसानभरपाईची तरतूद

By admin | Updated: June 14, 2017 00:24 IST

साप मारल्यास शिक्षा, चावल्यास ठेंगा !

श्याम बागुल । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वन्यजिवाने चावा घेतल्यास अथवा त्याच्या हल्ल्यात जीव गेल्यास आर्थिक मदतीची तरतूद असलेल्या वन्यजीव संरक्षण अधिनियमात संरक्षित असलेल्या विषारी साप, नागाच्या दंशाने बळी गेलेल्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. उलट साप बाळगल्यास वा जिवाच्या भीतीने त्याला मारल्यास कायद्यात कडक शिक्षेची तरतूद करण्यात आल्याची बाब नागरिकांच्या जिवावर उठली आहे. केंद्र सरकारने वन्यजिवांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने कायदा केला असून, त्यात जंगलातील जवळपास सर्वच हिंस्त्र प्राणी तसेच पक्ष्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या कायद्याच्या आधारे वन्यजीव बाळगणे, त्यांचे संगोपन करणे अवैध ठरविण्याबरोबरच त्यांची हत्या करणे वा त्याला जखमी करणे कायद्याने गुन्हा ठरविला आहे. तसेच वन्यजीव म्हणून गणल्या जाणाऱ्या प्राण्यांकडून हल्ला झाल्यास वा व्यक्तीचा जीव गेल्यास संबंधितांना नुकसानभरपाई देण्याचीही तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यात सापांचाही समावेश करण्यात आला आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे नेहमीच सांगितले जाते व त्यामुळे साप दिसल्यास त्याला मारू नये म्हणून जनजागृतीही केली जाते, परंतु हाच शेतकऱ्यांचा मित्र असलेला साप बाळगल्यास वा मारल्यास दोन वर्षे शिक्षेची कायद्यात तरतूद असून, याच कायद्याच्या आधारे वन खात्याकडून दरवर्षी नागपंचमीला नागाच्या पूजेच्या निमित्ताने घरोघरी पैसे गोळा करीत फिरणाऱ्या गारुड्यांवर कारवाई केली जाते. या कायद्यान्वये सापांच्या प्रजातींचे संरक्षण करण्यास बळ मिळाले असले तरी, वन्य जीव संरक्षण अधिनियमान्वये संरक्षण मिळालेल्या सर्पांच्या दंशाने दरवर्षी शेकडो नागरिकांचा बळी जात आहे. विशेषत: पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होऊन त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. वन्यजीव कायद्यान्वये सर्प वगळता अन्य प्राण्यांच्या हल्ल्याने जखमी वा मृत झालेल्यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे; परंतु सापाने दंश केल्यामुळे जखमी वा मृत झालेल्यांना मात्र नुकसानभरपाईची तरतूद या कायद्यात नसल्याने त्यात जाणारे बळी निरर्थकच ठरविण्यात आले आहेत. केंद्र सरकारचा कायदा असल्यामुळे त्यात बदल वा दुरूस्ती सुचविण्याचा अधिकार वन खात्याला नाही, परिणामी सर्पदंशाने बळी वनखाते अनभिज्ञवन्यजीव संरक्षण अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वन खात्यावर असली तरी, सर्पदंशाने जखमी वा मृत झालेल्यांबाबतची कोणतीही माहिती या खात्याकडे नाही. नागरिकांच्या तक्रारीवरून वन खात्याने सर्प बाळगणाऱ्या दोघा-तिघांवर कारवाई केली आहे, परंतु सर्प मारून टाकण्याच्या किती घटना घडल्या याचीही नोंद नसल्याचे विभागीय वन अधिकारी व्ही. टी. घुले यांनी सांगितले. पावसाळ्यात सर्पदंशाच्या प्रमाणात वाढपावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते, विशेषत: शेतात गवत वाढल्यामुळे भक्ष्याच्या शोधात साप बाहेर पडतात व त्यातून शेतकरी, शेतमजुरांना दंशाचे प्रमाण वाढते. सर्पदंशाच्या घटना पाहता, ९५ टक्के साप बिनविषारी असतात; मात्र पाच टक्क्यांमध्ये नाग व घोणसचा समावेश आहे. त्यांच्या दंशानंतर तत्काळ औषधोपचार केल्यास व्यक्ती बचावण्याची शक्यता अधिक असते, परंतु बहुतांशी वेळेस दंश करणारा साप विषारी की बिनविषारी याचा उलगडा होत नसल्यामुळे उपचाराला विलंब होतो. विषारी नाग चावल्यास चक्कर येणे, बोलण्यास त्रास होणे, श्वास मंदावण्याची लक्षणे आहेत तर घोणस ज्या ठिकाणी दंश करते तेथे तत्काळ सूज येऊन रक्तप्रवाहातून विष मेंदूपर्यंत पोहोचून रुग्ण दगावण्याची शक्यता असते.- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक सापाला वन्यप्राण्यांच्यायादीतून वगळासापाचा वन्यजीव सुरक्षा कायद्यात समाविष्ट करण्यात आल्यामुळे साप मारल्यास वा पकडल्यास शेतकरी व शेतमजुरांना दोन वर्षे शिक्षा असलेल्या गुन्ह्यात अडकविण्यात येते, परंतु साप चावून मनुष्य मेल्यास त्याला इतर वन्यप्राण्यांप्रमाणे आर्थिक मदतीचे अनुदान देय नाही. दरवर्षी शेकडो शेतकरी, शेतमजूर व पशुधन राज्यात साप चावून मरतात. म्हणून सर्पदंश होऊन मनुष्य मेल्यास त्यालाही इतर वन्यप्राण्यांप्रमाणे आर्थिक अनुदान देण्यात यावे किंवा साप हा प्राणी वन्यप्राण्यांच्या यादीतून वगळण्यात यावा. - वामनराव चटप, माजी आमदार, शेतकरी संघटना