शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

द्वारकाकडे जाणाºया समांतर रस्त्यांवर ‘नो-एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:45 IST

द्वारका चौकात शहरातील मुख्य चार व अन्य सात उपरस्ते एकत्र येतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने वाहतूक पोलीस प्रशासनाच्या नाकीनव आले आहे. यामुळे पोलिसांनी द्वारकेच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. समांतर रस्त्यांवरून द्वारकेकडे वाहने जाणार नाही, अशी अधिसूचना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुरुवारी (दि. ३0) जारी केली.

ठळक मुद्देबागवानपुऱ्यात जाणाºया वाहनांना बंदी

नाशिक : द्वारका चौकात शहरातील मुख्य चार व अन्य सात उपरस्ते एकत्र येतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने वाहतूक पोलीस प्रशासनाच्या नाकीनव आले आहे. यामुळे पोलिसांनी द्वारकेच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. समांतर रस्त्यांवरून द्वारकेकडे वाहने जाणार नाही, अशी अधिसूचना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुरुवारी (दि. ३0) जारी केली.द्वारकेची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. द्वारका मोकळा श्वास कसा घेईल, यादृष्टीने सर्वोपरी प्रयत्न के ले जात आहे. शहर वाहतूक पोलिसांनी विविध उपाययोजना उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यास सुरुवात केली आहे. यानुसार २८ जून २०१६ साली काढली गेलेली अधिसूचना पुन्हा नव्याने काढण्यात येत असल्याचे चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या अधिसूचनेनुसार वडाळा नाका, टाकाळीफाटा, ट्रॅक्टर हाउस, झाकीर हुसेन रुग्णालयामार्गे समांतर रस्त्यांचा होणारा दुहेरी वापर थांबविण्यात येणार आहे. या मार्गांवरून कोणतेही वाहन द्वारकेवर येणार नाही, तर महामार्गाचा वापर करून द्वारकेवर येतील, असे चौगुले म्हणाल्या.सारडा सर्कलवरून ‘यू-टर्न’द्वारकेवरून बागवानपुºयात जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. बागवानपुरामार्गे जुन्या नाशकात जाणारी सर्व वाहतूक सारडा सर्कलमार्गे यू-टर्न घेत फाळके रोडमार्गे पुढे जातील. बागवानपुरा मार्गे केवळ द्वारकेवर येण्यासाठी परवानगी राहणार आहे. वरील निर्बंध मात्र शववाहिका, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने यांना लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही अधिसूचना जाहीर झाल्यानंतर त्याचा भंग करणाºया वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे चौगुले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा