शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

निवृत्तीनाथा,धाव आता पाव आता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:35 IST

नाशिक- संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे कार्य म्हणजे साक्षात संतांची सेवा! पण तेथे कोणी ह्यमेवाह्ण खाऊ नये हे तितकेच खरे, त्यामुळे या महाराजांच्या समाधी मंदिराच्या सेवाकार्यासाठी कारभारी निवडताना त्याचा अंतकरणातील भावही महत्वाचा. त्यातूनच कठीण परीक्षेतून जाताना अनेकांना हरीपाठाचा अभ्यास करावा लागला तर कुणाला संत वचने- भजने पाठ करावी लागली. काहींना तर चक्क वारकरी पेहराव करून निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागले. अखेर सर्व सोपस्कार झाले, आता फक्त परिश्रम सत्कारणी लागले म्हणजे निवड झाली की, गोदाकाठी पुण्यप्राप्ती झालीच म्हणून समजा! त्यासाठीच अनेकांनी ह्यनाथा धाव आता, पाव आताह्ण असा धावा सुरू केला आहे.

ठळक मुद्देट्रस्टसाठी व्याकुळता: खडतर परीक्षार्थी झालेल्या इच्छुकांची वाढली तगमग

नाशिक- संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे कार्य म्हणजे साक्षात संतांची सेवा! पण तेथे कोणी मेवा खाऊ नये हे तितकेच खरे, त्यामुळे या महाराजांच्या समाधी मंदिराच्या सेवाकार्यासाठी कारभारी निवडताना त्याचा अंतकरणातील भावही महत्वाचा. त्यातूनच कठीण परीक्षेतून जाताना अनेकांना हरीपाठाचा अभ्यास करावा लागला तर कुणाला संत वचने- भजने पाठ करावी लागली. काहींना तर चक्क वारकरी पेहराव करून निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागले. अखेर सर्व सोपस्कार झाले, आता फक्त परिश्रम सत्कारणी लागले म्हणजे निवड झाली की, गोदाकाठी पुण्यप्राप्ती झालीच म्हणून समजा! त्यासाठीच अनेकांनी नाथा धाव आता, पाव आता असा धावा सुरू केला आहे.त्र्यंबकेश्वर येथे संत शिरोमणी निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी सध्या भलती चढाओढ सुरू आहे. विश्वस्त मंडळावर तशी वर्षानुवर्षे अनेक मंडळी राहिली आहेत. मात्र आता अशा संस्थावरील नियुक्त्या या पारदर्शकपणे, ठराविक वेळेत व्हाव्या, त्या विषयाशी संबंधित आणि खऱ्या अर्थाने सेवेसाठी येणाऱ्यांची निवड व्हावी यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. केवळ हौसे साठी किंवा पदे मिळवण्यासाठी येणाऱ्यांना त्याचा अनुभव आल्याचेही वृत्त आहे.विश्वस्तपदाच्या नऊ जागांसाठी तब्बल १८७ सेवेकरी इच्छुक! मग काय परीक्षा खडतर असणारच. हा विषय हाताळणाऱ्यांनी तशी ती घेतलीही.विश्वस्तपदासाठी असलेल्या काही प्रमुख अटींमध्ये तो स्थानिक रहिवासी असावा, त्याला विश्वस्त असावा असे तर नियम आहेच परंतु वारकरी देखील विश्वस्त असावा असेही निकष आहेत. त्यामुळेच खरी परीक्षा झाली. मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी हरीपाठातील भजने म्हणावयास सांगितली तर कुणाला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचे जीवन कार्य विचारले. संजीवन समाधी आणि जिवंत समाधीत फरक काय, असे अनेक प्रश्न केल्यानंतर काहींची अडचण झाल्याचेही समजते. काही इच्छुक तर अत्यंत वल्ली! मुलाखतीसाठी येतानाच जणू वारीसाठी आल्याचा पोशाख करून आले आणि हरीपाठ विचारल्यानंतर प्रत्यक्ष कृतीने हरीपाठ सादर करून दाखवू लागले अशीही चर्चा आहे.अखेर मुलाखतींचे सोपस्कार गेल्या १२ जानेवारीस सुफळ संपूर्ण झाले. परंतु कारभारी कोण यांचा फैसला मात्र जाहीर झालेला नाही. त्यामुळे विश्वस्तपदाची स्वप्ने बघणारे अनेक जण हरीपाठ करीत आहेत तर कुणी निवृत्तीनाथालाच धाव पाव आता असे साकडे घालत आहेत. पुढील महिन्यात एकादशीला संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे, तोपर्यंत तरी कारभारी झालो तर मान काही औरच राहील अशा अपेक्षेने अनेकांची तगमग सुरू आहे.पदासाठी वाट्टेल ते...विश्वस्तपद अलीकडे मानाचे झाल्याने अनेकजण त्यासाठी केवळ डोळे लावून बसले आहेत असे नाही तर काही जण या ना त्या मार्गाने नऊ नशिबवान विश्वस्तांमध्ये आपले नाव असावे यासाठी धावपळ करीत आहेत. कुणी आमदाराची चिठ्ठी आणतो तर कुणी खासदार दूताला धाडतो असे अनेक प्रकारांच्या चर्चा सध्या सुरू आहेत. अर्थात प्रयत्नांती धर्मादाय आयुक्त अशी साऱ्यांची अवस्था आहे.