शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

निवृत्तिनाथ समाधी महापूजा

By admin | Updated: January 24, 2017 01:21 IST

हजारोंची उपस्थिती : वासाळी येथील दांपत्यास प्रथम भाविकाचा मान

त्र्यंबकेश्वर : हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीसंत निवृत्तिनाथांच्या संजीवनी समाधीची महापूजा नगराध्यक्ष विजया लढ्ढा व त्यांचे पती दीपक लढ्ढा यांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी श्री निवृत्तिनाथ समाधी संस्थानतर्फे करण्यात येणारी महापूजा नाशिक विभागाचे धर्मादाय आयुक्त प्रदीपराव घुगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनीही सपत्नीक श्री निवृत्तिनाथ संजीवन समाधीची महापूजा केली.  याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय घोंगडे, सचिव पवनकुमार भुतडा, माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, सचिव पवनकुमार भुतडा, माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, रामभाऊ मुळाणे आदि उपस्थित होते. अचारसंहितेच्या कारणास्तव या महापूजेप्रसंगी भाषणाला फाटा देऊन नगरपालिका व विश्वस्त मंडळातर्फे फक्त सत्कार समारंभ करण्यात आला.  निवृत्तीनाथ देवस्थानतर्फे मंदिर जीर्णोद्धार, यात्रेकरूंसाठी मूलभूत सुविधा, दिंड्यांसाठी जागेचा प्रश्न आदिंचा समावेश केंद्र शासनाच्या ‘प्रसाद’ योजनेत करावा अशी अपेक्षा निवृत्तीनाथ विश्वस्थ मंडळातर्फे अध्यक्ष धोंडगे यांनी व्यक्त केली. तसेच शासन निवृत्तीनाथ देवस्थानकडे उदासिनतेने पाहात आहेत. या देवस्थानकडे लक्ष दिले जात नाही. अशी खंत धोंडगे यांनी व्यक्त केली. सिंहस्थ काळात देण्यात येणाऱ्या सुविधा, शेडस् आदि दिलेच नाहीत. म्हणून पंढरपूर आळंदीच्या धर्तीवर येथेही लक्ष द्यावे, अशी मागणी विश्वस्त मंडळाकडून करण्यात आली.  यावेळी वारकरी महामंडळाचे ह.भ.प. रामेश्वरशास्त्री, मुख्याधिकारी डॉ. चेतन माकरेकेसरे, माजी उपनगराध्यक्ष संतोष कदम, अभिजीत काण्णव, सुनील अडसरे, अनघा फडके, शामराव गंगापुत्र, जिजाबाई लांडे, धनश्री हरदास, भूषण अडसरे, अलका शिरसाठ, यशोदा अडसरे, सुरेश गंगापुत्र, राजेंद्र शिरसाठ, योगेश (पिंटू) तुंगार, धनंजय तुंगार, माधुरी जोशी, अंजनाताई कडलग, हर्षल भालेराव, उपेंद्र शिखरे, दत्ताजी जोशी, गणपत कोकणे, योगेश गोसावी आदि उपस्थित होते. विश्वस्त मंडळ व त्र्यंबक नगरपरिषदेने केलेल्या महापूजेचे पौरोहित्य देवस्थानचे विश्वस्त जयंत गोसावी व अभिजित काण्णव यांनी केले. (वार्ताहर)