सातपूर : येथील निवेकची द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष संदीप सोनार यांची पुनश्च निवड झाली आहे, तर सरचिटणीसपदी संदीप गोयल यांची निवड करण्यात आली आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीतील निवेक क्लबची द्वैवार्षिक निवडणूक घोषित करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. पी. सोनार सहायक म्हणून लक्ष्मण पाचकवडे, शांतिलाल लखानी यांनी काम पाहिले. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली़़ शुक्रवारी झालेल्या निवेकच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकारी बी. पी. सोनार यांनी बिनविरोध झालेल्या कार्यकारिणी सदस्यांची नावे घोषित केली. या कार्यकारी सदस्यांमधून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष संदीप सोनार यांची फेरनिवड करण्यात आली, तर सरचिटणीसपदी संदीप गोयल, उपाध्यक्षपदी राजकुमार जॉली, सचिवपदी रणजीत सिंग, खजिनदारपदी जनक सारडा यांची, तर कार्यकारिणी सदस्यपदी मंगेश पाटणकर, गौरव चांडक, शिशिर भार्गव, प्रितपालसिंग बिरदी, पंकज खत्री, आशिष अरोरा, आशिष महेशिका, हेमंत कपाडिया, अशोक हेंबाडे, अरु ण अहेर, राजेंद्र सूर्यवंशी, श्रेयस राठी आदिंचा समावेश आहे. संदीप सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सभेत मागील वर्षाचा अहवाल सादर करण्यात आला. नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संजीव नारंग, रमेश वैश्य, तुषार अंधृटकर, मनीष कोठारी, समीर पटवा, शैलेश वैश्य आदिंसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
निवेकची द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध
By admin | Updated: October 3, 2015 00:01 IST