शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

By admin | Updated: October 16, 2016 01:25 IST

निफाडला बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

 निफाड : येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या शेतवस्तीत घराजवळील गोठ्यात बांधलेल्या शेळीवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला. यावेळी गोठ्यात दोन गायी, दोन वासरेही होती. मात्र ती सुदैवाने वाचली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर वनविभागाला कळविण्यात आला. वन कर्मचाऱ्यांनी भेट देत पंचनामा केला.येथील सुरेश फकीरराव जाधव हे शेतवस्तीवर राहातात. नेहमी प्रमाणे घराजवळच गोठ्यात दोन गायी, दोन वासरे व शेळी बांधलेली होती. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने तीन ते चार फूट उंच भिंतीवरून उडी मारून गोठ्यात प्रवेश केला व तिथे बांधलेल्या शेळीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला. सकाळी जाधव यांना बिबट्याने शेळीला ठार केल्याचे लक्षात आले. त्यांनी ही घटना येवला वनविभागाला कळविली. वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक दिलीप अहिरे, विजय लोंढे, भय्या शेख घटनास्थळी गेले व पंचनामा केला. निफाड तालुक्यात आतापर्यंत शेळ्या, कुत्रे, कोल्हे, रानडुकरांवर हल्ले करून फडशा पडला आहे. मागील महिन्यात कुरडगाव शिवारात एका गाईला बिबट्याने ठार केले होते.(वार्ताहर)