शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

‘हद्दपारी’ रद्दमुळे निफाडचे प्रांत वादात

By admin | Updated: June 7, 2016 07:29 IST

सारे काही अजबच : आठ गुन्हे करूनही कारवाईला स्थगिती

 नाशिक : पोलीसपाटील भरतीत मुक्तहस्ते ‘गुण’ उधळणाऱ्या आणि त्यामुळेच वादात सापडलेले निफाडचे प्रांत शशिकांत मंगरुळे आता एका गुन्हेगाराची हद्दपारी रद्द करण्याच्या मुद्द्यावरून वादात सापडले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने याप्रकरणाची प्रांताची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.मूळचे गोंडेगावचे असलेले संजय मल्हारी मते यांच्यावर निफाड पोलीस ठाण्यातील सात व आडगाव पोलीस ठाण्यातील एक अशा एकूण आठ प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. त्यातही ३०६, ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने निफाड पोलीस निरीक्षक कार्यालयाने संजय दाते यांना नाशिकसह धुळे, जळगाव, अहमदनगर व नंदुरबार जिल्'ांतून हद्दपार करण्याचा प्रस्ताव निफाडचे प्रांत शशिकांत मंगरुळे यांच्याकडे सादर केला होता. यात संबंधित इसम संजय मल्हारी दाते यांच्यावर चांदोरी व सायखेडा परिसरात दादागिरी करणे, दहशत पसरविणे, हाणामारी करणे यासह गंभीर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट केले होते.संजय दाते यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ८८/२००३ नुसार भादंवि १४३, १४७, १४८, व ३०७, गुन्हा रजिस्टर नंबर १२७/२००५ नुसार भादंवि ३०६, ३८४, गुन्हा रजिस्टर नंबर २३/२००४ नुसार भादंवि १६०,गुन्हा रजिस्टर नंबर ११९/२०११ नुसार भादंवि २७९, ३०४(अ), गुन्हा रजिस्टर नंबर ९८/२०१३ नुसार भादंवि १४३,१४७,१४८,१४९, ३५४, गुन्हा रजिस्टर नंबर १८७/२०१४ नुसार भादंवि ३२५,३२३,५०४,५०६-३४, भद्रकाली पोलीस ठाण्यात ७६/२०११ भादंवि - ३२५, ३४१, ५०६ तसेच आडगाव पोलीस ठाण्यात ७०/२०१५ नुसार ३०७, १२० (ब) ३२३, ५०६ आदि स्वरूपात गुन्हे दाखल असल्याने संजय दाते यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावास २६ फेब्रुवारी २०१६ रोजी निफाड प्रांत शशिकांत मंगरुळे यांनी स्थगिती दिली. स्थगितीचे कारण दोन गुन्'ात संजय दाते निर्दोष सुटल्याचे व अन्य गुन्हे वैयक्तिक स्वरूपाचे असल्याचे सांगत त्यामुळे संजय दाते यांना हद्दपार केल्यास तो नैसर्गिक न्यायाला धरून होणार नाही. मुळात गुन्हा हा गुन्हा असून, तो वैयक्तिक की सार्वजनिक अशी ‘फोड’ करण्याचे कारण काय? असा प्रश्न तक्रारकर्त्यांनी केला आहे. याच प्रकरणामुळे पोलीस आणि महसूल यांच्यात निफाडमध्ये संबंध ताणले गेल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)